Pune News: भीमाशंकरच्या आदिवासी दुर्गम डोंगरी भागात स्ट्रॉबेरीचे पीक आता मूळ धरू लागले आहे. कृषी आणि आदिवासी विभागाच्या वतीने आदिवासी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जात असल्याने, शेतकरी संख्या आणि क्षेत्र वाढत आहे. या वर्षी १३० शेतकऱ्यांकडून सुमारे २१ एकरवर लागवड करण्यात आली असून, त्याचे उत्पादन सुरू झाले आहे. गेल्या वर्षी ५५ शेतकऱ्यांनी १० एकरवर लागवड केली होती. .मागील वर्षी आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील १७ गावांमधील ५५ शेतकऱ्यांनी सुमारे १० एकररवर स्ट्रॉबेरीचे पीक घेतले असून यंदा १५० शेतकऱ्यांनी सुमारे २५ एकरवर स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. उत्पादन चांगले मिळत असल्याने दिवसेंदिवस स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. केंद्रीय अर्थसंकल्प योजनेअंतर्गत (न्यूक्लिअस बजेट) अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना शेतात स्ट्रॉबेरी लागवडीस अर्थसाह्य मिळत आहे..Mahabaleshwar Strawberry: ‘जीआय टॅग स्ट्रॉबेरी’वरून शेतकरी आक्रमक.भीमाशंकर क्लस्टर साकारण्यासाठी माजी मंत्री आणि आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घोडेगाव आदिवासी प्रकल्प संचालक प्रदीप देसाई, तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे, कृषी सहायक रवींद्र पारधी, चेतन भोईर, अरविंद मोहरे हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत..Strawberry Cultivation: शेतकरी घेणार स्ट्रॉबेरी लागवडीची माहिती.या कारणांमुळे कल -भीमाशंकर येथील तीर्थक्षेत्र व पर्यटनासाठी राज्यभरातून असंख्य भाविक, पर्यटक या भागात येत असल्याने स्ट्रॉबेरी खरेदीसाठी ग्राहक उपलब्ध होत आहेत. शासनाकडून अनुदान तसेच स्ट्रॉबेरीचे उत्पादनही चांगले मिळत असल्याने शेतकऱ्यांचा स्ट्रॉबेरीकडे कल वाढत चालला आहे..या गावांमध्ये लागवडफुलवडे, फलोदे, तळेघर, जांभोरी, गाडेवाडी, गोहे बुद्रुक, गोहे खुर्द, राजेवाडी, पोखरी, चिखली, पाटण, डोण, माळीण, असाणे, बोरघर, अडिवरे, पंचाळे, निगडाळे..यावर्षी आदिवासी विभागद्वारे १५० स्ट्रॉबेरी उत्पादक प्रति शेतकऱ्यांना प्रति पाच गुंठ्यासाठी ४० हजार ३०० रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. गेल्या वर्षीपेक्षा शेतकरी संख्या आणि क्षेत्र वाढले असून, भीमाशंकर स्ट्रॉबेरी क्लस्टर साकारत आहे. स्ट्रॉबेरीचा भीमाशंकर ब्रॅण्ड विकसित करण्यासाठी लवकरच भीमाशंकर स्ट्रॉबेरी फेस्टिव्हल आयोजित करण्याचा मानस आहे.प्रदीप देसाई, आदिवासी प्रकल्प संचालक, घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे.मी ५ गुंठे क्षेत्रात स्ट्रॉबेरीची ३ हजार १०० रोपांची लागवड केली आहे. पीक चांगले बहरून आले असून स्ट्रॉबेरीचे उत्पादन सुरू झाले आहे. आम्हाला पारंपरिक भात पिकात जास्त उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर स्टॉबेरीचे पीक घेऊन पाहिले. पीक चांगले बहरून आले असून स्ट्रॉबेरीचे उत्पादन सुरू झाले आहे. या पिकासाठी आम्हाला शासनाकडून अनुदानही मिळत आहे. त्यामुळे आम्हाला खूप मदत होत आहे.अर्जुन भारमळ, फुलवडे ता. आंबेगाव.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.