NCP Party : अकोला, बुलडाणा जिल्ह्यांत राष्ट्रवादीत तयार झाले गट

Maharashtra Politics : राज्यात रविवारी (ता. २) अजित पवार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत खळबळ उडवून दिली.
NCP Party
NCP PartyAgrowon
Published on
Updated on

Akola NCP Party News : राज्यात रविवारी (ता. २) अजित पवार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत खळबळ उडवून दिली. त्यांनी घेतलेल्या या भूमिकेने आता जिल्ह्या-जिल्ह्यातही गट तयार होऊ लागले आहेत. काही जण त्यांच्या पाठीशी, तर काही जण हे शरद पवार यांच्याच सोबत असल्याचे सांगत आहेत.

अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेला अकोल्यात विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी समर्थन देत शपथविधीला हजेरी लावली. त्यांच्या पाठोपाठ इतर काही पदाधिकाऱ्यांनीही अजित पवार यांच्यासोबत जाण्याचे स्पष्ट संकेत दिले.

पक्षाचे जुने जाणते नेते हे शरद पवार यांच्याच सोबत असल्याचे सांगत आहेत. एकीकडे अजित पवार यांचा शपथविधी सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी जिल्ह्यातील पदाधिकारी व नेत्यांची तातडीची बैठक घेतली. यामध्ये शरद पवार यांच्यासोबतच राहण्याचा निर्धार व्यक्त केल्याचे समजते.

जिल्ह्यात राष्ट्रवादीचे एकमेव आमदार असलेले मिटकरी हे अजित पवार यांच्यासोबत गेल्याने त्यांच्या समर्थकांनी जल्लोश केला. या घडामोडींचा जिल्ह्याच्या राजकारणावरही परिणाम होण्याची चिन्हे आहेत.

NCP Party
Maharashtra NCP Crisis : पक्षावर ताब्यासाठी रस्सीखेच

बुलडाण्यातील बहुतांश नेते शरद पवारांसोबत

राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाल्यापासून विदर्भात पक्षाला ज्या दोन-तीन जिल्ह्यांत मोठा जनाधार आहे, त्यात बुलडाण्याचा समावेश आहे. या जिल्ह्यात डॉ. राजेंद्र शिंगणे हे सातत्याने पक्षाचे नेतृत्व करीत आहेत. गेल्या वेळी अजित पवारांनी पहाटेला शपथ घेतली तेव्हा काही काळ शिंगणे हे सोबत दिसले होते.

मात्र, त्यांनी नंतर लगेच शरद पवार यांची भेट घेत संभ्रम दूर केल्याचे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले होते. यावेळी डॉ. शिंगणे हे अजित पवारांच्या सर्व घडामोडींपासून दूरच आहेत. शपथविधीनंतर त्यांनी आपण व जिल्ह्यातील पक्ष हा शरद पवार यांच्यासोबतच असल्याचे तातडीने स्पष्ट केले आहे.

परंतु जिल्ह्यातील काही पदाधिकारी हे अजित पवारांच्या भूमिकेला पाठिंबा देऊ लागले आहेत. एका माजी जिल्हाध्यक्षांनी अजित पवारांचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे.

तर मलकापूरमधील माजी आमदार वसंतराव शिंदे यांनीही समर्थन केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात ही येत्या काळात राष्ट्रवादीचे गट बघायला मिळणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com