Groundnut Cultivation : सातारा जिल्ह्यात २८०० हेक्टरवर भुईमूग लागवड

मागील महिन्यात झालेल्या वादळी पाऊस उन्हाळी पिकांना उपयुक्त ठरला असून, पिकांची वाढ चांगली झाली आहे.
Groundnut Cultivation
Groundnut CultivationAgrowon
Published on
Updated on

Satara News : सातारा जिल्ह्यातील उन्हाळी पेरणी (Summer Sowing) अंतिम टप्प्यात आली असून, या पेरणीत उन्हाळी भुईमुगाची २८२८ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. मागील महिन्यात झालेल्या वादळी पाऊस उन्हाळी पिकांना उपयुक्त ठरला असून, पिकांची वाढ चांगली झाली आहे.

जिल्ह्यात पश्‍चिम भागात उन्हाळी पेरणी केली जात होती. आता मात्र पूर्व भागातही पाण्याची उपलब्धता झाल्याने उन्हाळी पेरणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

उन्हाळी पेरणी सर्वाधिक भुईमूग, मका तसेच काही प्रमाणात सोयाबीन लागवड केली जात आहे. कृषी विभागाकडून जिल्ह्यात ४८०४ हेक्‍टर क्षेत्र उन्हाळी पिकांच्या सर्वसाधारण क्षेत्र निश्‍चित करण्यात आले होते.

Groundnut Cultivation
Groundnut Cultivation : या पद्धतीने करा उन्हाळी भुईमुगाची लागवड

या हंगामात या क्षेत्रापेक्षी जास्त म्हणजे ५०११ हेक्‍टर क्षेत्रावर म्हणजेच १०४.३१ टक्के उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. उन्हाळी भुईमुगाचे २६९९ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून, भुईमुगाची २८२८ हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच १०४.७८ टक्के पेरणी झाली आहे.

मक्याचे २०७४ हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी १०४० हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. उन्हाळी सोयाबीन घेतले जाऊ लागले असून, सोयाबीनची ८० हेक्टरवर लागवड झाली आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक फलटण तालुक्यात १३८९ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. रब्बी ज्वारीच्या कडब्याचे दर वाढल्यामुळे उन्हाळी मका जनावरांना उपयुक्त ठरणार आहे.

तालुकानिहाय उन्हाळी पेरणी झालेली क्षेत्र (हेक्‍टरमध्ये)

सातारा- २९८, जावळी- ९५, पाटण- २८७, कराड- ३२४, कोरेगाव- ३०८, खटाव-५९७, माण-७१०, फलटण-१३८९, खंडाळा-६०२, वाई-४०१, महाबळेश्‍वर-००.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com