थोडक्यात माहिती:१. ग्रीनिंग रोग हा जिवाणूमुळे होतो आणि सिट्रस सायला किडीमुळे झपाट्याने पसरतो.२. झाडाची पानं पिवळसर होतात, फळं लहान, सुरकुतलेली व रस कडवट होतो.३. सिट्रस सायला किड कोवळ्या पानांचा रस शोषून कळ्यांची गळ घडवते.४. रोग नियंत्रणासाठी रोगमुक्त कलमं, नियमित फवारणी व पिवळे चिकट सापळे उपयुक्त.५. थायामेथोक्झाम किंवा इमिडाक्लोप्रिड कीटकनाशकाची शिफारसीनुसार फवारणी करून रोगाचा प्रसार थांबवता येतो..Greening Disease Control: संत्रा-मोसंबीवरील ग्रिनींग किंवा मंद ऱ्हास रोग लिंबूवर्गीय फळपिकातील सर्वात महत्त्वाचा आणि विनाशकारी रोग आहे. त्याचा प्रसार सध्या मराठवाडा आणि विदर्भात दिसतो आहे. या रोगामुळे फळझाडे कमजोर होतात, फळे पिकत नाहीत. जिवाणूमुळे होणारा हा रोग सिट्रस सायला या किडीमुळे पसरतो. योग्य उपाययोजना आणि फवारण्या केल्यास शेतकरी रोगाचे नियंत्रण करु शकतात..ग्रीनिंग रोगाची लक्षणे:झाडाला ग्रीनिंग रोग झाला की पानांच्या शिरांमधील भाग पिवळसर दिसायला लागतो. हा पिवळेपणा दोन्ही बाजूंनी सारखा नसतो.काही पानांवर लहान-लहान हिरवे ठिपके दिसतात आणि चट्टेही पडतात.रोगग्रस्त पानावर इंग्रजीतील "V" आकाराचे डाग दिसतात.पानांच्या खालच्या बाजूच्या शिरा फुगतात आणि शिरांच्या मध्ये असलेला भाग पिवळसर होतो..Phytophthora: मोसंबी, संत्रा फळसड रोग कशामुळे होतो, त्याची लक्षणे आणि त्याचे व्यवस्थापन.हळूहळू झाडाची वरच्या टोकाची पाने गळू लागतात.३ ते ४ वर्षांनी झाड खूप कमजोर होऊन सुकायला लागते.रोग झालेल्या झाडावरची फळे आकाराने लहान राहतात, नीट वाढत नाहीत.फळांच्या बिया सुरकुतलेल्या असतात किंवा कधी बिया नसतात.फळांचा रस कडवट लागतो.फळाच्या देठाकडचा भाग पिवळसर-नारिंगी दिसतो, तर खालचा भाग जास्त हिरवा राहतो..रोगाचा प्रसार:नवीन कलम तयार करताना संसर्गग्रस्त कांडीपासून पसरतो. ग्रीनिंगग्रस्त मातृवृक्षाचे डोळे कलम तयार करण्यासाठी वापरले गेल्यास हा होतो. बागेमध्ये सिट्रस सायला (शास्त्रीय नाव - डायफोरनियाना सिट्री) या किडीमुळे या रोगाच्या प्रसारास मदत होते..सिट्रस सायला :संत्रावर्गीय झाडावर येणारी ही महत्त्वाची कीड आहे. झाडावर नवती, बहर फुटायला सुरुवात होताच प्रादुर्भावास सुरुवात होते. जून, जुलैमधील मृग बहार आणि फेब्रुवारी, मार्चमधील आंबिया बहरावर याचा प्रादुर्भाव जास्त असतो. या किडीचा प्रौढ पिवळसर करड्या रंगाचा असतो. पंखांच्या विशिष्ट रचनेमुळे त्याचा मागील भाग उंचावल्यासारखा दिसतो. .पिले मळकट रंगाची असतात. या किडींची पिले कोवळी पाने व फांद्या यातून रसशोषण करतात. त्यामुळे कोवळी पाने व कळ्यांची गळ होते. प्रादुर्भाव झालेल्या झाडावर बारीक साखरेसारखा पदार्थ दिसतो, किडीचा प्रादुर्भाव झाल्याची ही ओळख आहे. त्याचा उत्पादनावर फार परिणाम होतो..व्यवस्थापन :झाडावर भरपूर पालवी राहावी, यासाठी खतांचा शिफारसीनुसार वापर करावा. रोगमुक्त मातृवृक्षापासून कलम कांडी निवडाव्यात. रोगमुक्त कलमांचाच लागवडीसाठी वापर करावा.लागवड करताना सर्व अवजारे निर्जंतुक असल्याची खात्री करावी.एखाद्या फांदीमध्ये ग्रीनिंगची लक्षणे दिसल्यास तेवढीच फांदी तत्काळ कापून नष्ट करावी. प्रादुर्भाव जास्त असल्यास बाधित झाडे मुळासकट उपटून, जाळून नष्ट करावीत..फांद्याच्या कापणीसाठी वापरली जाणारे अवजारे सोडिअम हायपोक्लोराइट (१ टक्का) द्रावणाने निर्जंतुक करावीत.सिट्र्स सायला या किडीच्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे (३० बाय ४० सेंमी आकाराच्या फोमशीटपासून बनविलेले घरगुती किंवा तत्सम आकाराचे बाजारात उपलब्ध) ३० ते ४० प्रति एकर लावावे. हे सापळे फेब्रुवारी ते नोव्हेंबर दरम्यान लावावे.ढालकिडा, क्रायसोपा, सिरफीड माशी, टॅमरॅक्सिया रॅडीयाटा इ. मित्र कीटकांचे संवर्धन करावे..कढीपत्त्याचे झाड मोसंबीच्या बागेमध्ये किंवा आजूबाजूस लावू नये. कारण ही झाडे सायला किडीचे खाद्य असून त्यावर सायला कीड प्रजनन करतात.सिट्र्स सायला या किडीच्या नियंत्रणासाठी थायामेथोक्झाम (२५ डब्ल्यूजी) १ ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रिड (१७.८ टक्के एसएल) १ मि.लि. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. तरीही प्रादुर्भाव दिसत असल्यास १५ दिवसांच्या अंतराने कीटकनाशक बदलून दुसरी फवारणी करावी..वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)१. मोसंबीवरील ग्रीनिंग रोगाचे लक्षणं काय आहेत?पानं पिवळसर होणं, फळं लहान होणं, बिया सुरकुतणं, रस कडवट लागणं ही मुख्य लक्षणं आहेत.२. ग्रीनिंग रोगाचा प्रसार कसा होतो?सिट्रस सायला किडीमुळे आणि रोगग्रस्त कलमांमुळे हा रोग झपाट्याने पसरतो.३. सिट्रस सायला किडीचं नुकसान कसं होतं?किड कोवळ्या पानांचा रस शोषते, ज्यामुळे पानं गळतात आणि उत्पादन घटतं.४. ग्रीनिंग रोग टाळण्यासाठी काय उपाय आहेत?रोगमुक्त कलमांचा वापर, पिवळे चिकट सापळे, कीटकनाशक फवारणी आणि संसर्गग्रस्त फांद्या नष्ट करणं उपयुक्त आहे.५. ग्रीनिंग रोगावर कोणती फवारणी करावी?थायामेथोक्झाम (25 WG) 1 ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रिड (17.8% SL) 1 मि.ली. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.