Greenfield Highway : ग्रीनफिल्ड महामार्गाबाबत लंके यांची गडकरींशी चर्चा

Nitin Gadkari : या महामार्गामुळे अहिल्यानगर मतदारसंघातील उद्योग, कृषी, पर्यटन आणि व्यापारी क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. जिल्ह्यातील अनेक भागांतून पुणे आणि छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी मोठा वेळ लागतो.
Nitin Gadkari
Nitin Gadkari Agrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपे व रांजणगाव गणपती येथील वाढती औद्योगीक वसाहत तसेच त्या अनुषंगाने या मार्गावर वाढलेली वाहतूक व वारंवार होणारी वाहतुकीची कोंडी विचारात घेऊन अहिल्यानगर-पुणे महामार्गावर ग्रीनफिल्ड महामार्गासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी व खासदार नीलेश लंके यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. या वेळी मंत्री गडकरी यांनी या महामार्गाबाबत सकारात्मकता दाखवली.

अहिल्यानगर- पुणे महामार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी आहे. हा महामार्ग केवळ पुणे आणि छत्रपती संभाजीनगरला जोडणारा नसून अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण आणि शहरी भागाच्या दळणवळणाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा असल्याचे खासदार लंके यांनी मंत्री गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिले.

Nitin Gadkari
Ratnagiri-Nagpur Highway : आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर अधिकाऱ्यांची मोजणीकडे पाठ

या महामार्गामुळे अहिल्यानगर मतदारसंघातील उद्योग, कृषी, पर्यटन आणि व्यापारी क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. जिल्ह्यातील अनेक भागांतून पुणे आणि छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी मोठा वेळ लागतो.

Nitin Gadkari
Impact of National Highways on Rivers: महामार्ग विकास की जलसंकट? वाढत्या पुरांचा धोका!

नव्या महामार्गामुळे हा प्रवास अधिक वेगवान आणि सोईस्कर होईल. त्यामुळे शेतकरी, व्यावसायिक आणि स्थानिक उद्योजक यांना मोठा फायदा होणार आहे.

दरम्यान, मंत्री नितीन गडकरी यांची भेट महामार्गाच्या दृष्टीनेच नव्हे तर अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील एकूणच विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली. असे खासदार नीलेश लंके म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com