Minister Sudhir Mungantiwar : ग्रामसेवकावर विकासाची मोठी जबाबदारी : मंत्री मुनगंटीवार

Rural Development : गावाच्या विकासासाठी ग्रामसेवकांनी तन-मनाने काम करावे, अशी अपेक्षा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
Minister Sudhir Mungantiwar
Minister Sudhir MungantiwarAgrowon

Chanadrapur News : गावाच्या विकासासाठी ग्रामसेवकांनी तन-मनाने काम करावे, अशी अपेक्षा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

जिल्हा परिषदेच्या वतीने प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात आयोजित आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळ्यात उद्‍घाटक म्हणून ते बोलत होते.

या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अशोक मातकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिलनाथ कलोडे, श्याम वाखर्डे आदी उपस्थित होते.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्षे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देता आले नाहीत, असे सांगून मुनगंटीवार म्हणाले, की या वर्षी तीनही वर्षांचे पुरस्कार एकत्र देण्यात येत आहे. पुरस्कार प्राप्त केवळ ४५ ग्रामसेवक आदर्श नाहीत, तर या जिल्ह्यातील प्रत्येकच ग्रामसेवक आदर्श असला पाहिजे.

तेव्हाच हा जिल्हा प्रगतीच्या वाटेवर मार्गक्रमण करेल. आपले राज्य ही संतांची भूमी आहे. राष्ट्रसंतांनी सांगितलेली ग्रामगीता हा गावाच्या विकासासाठी उत्कृष्ट असा ग्रंथ आहे.

Minister Sudhir Mungantiwar
Minister Gulabrao Patil : ग्रामसेवक, सरपंचांनी पारदर्शकपणे काम करा

प्रत्येक सरपंच आणि ग्रामसेवकाने हा ग्रंथ वाचलाच पाहिजे. कारण सरपंच हा त्या गावचा मुख्यमंत्री तर ग्रामसेवक हा मुख्य सचिव आहे. ज्यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाला नाही, त्यांनी आजपासून गावाच्या विकासाचा संकल्प करावा. आपण काय कृती करतो, यावर आदर्श समाजाची निर्मिती होईल.

शिक्षण व्यवस्थेबद्दल पालकमंत्री म्हणाले, ‘‘शिक्षण क्षेत्रात खूप मोठी भरारी घेण्याची गरज आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आजही देशात २५ कोटी लोक निरक्षर आहेत. हा आकडा आपल्या राज्यात १ कोटी ७५ लक्ष आहे. ही खरंच चिंतेची बाब आहे.

उच्च शिक्षण घेताना आपला परिवार आणि समाजाला विसरून चालणार नाही. त्यामुळेच शिक्षणासोबत सामाजिक आणि सुसंस्कृत शिक्षणाची गरज आहे.

शिक्षणावर सर्वात जास्त खर्च महाराष्ट्रात

शिक्षणावर सर्वांत जास्त खर्च महाराष्ट्र करीत असून, यासाठी ७७ हजार कोटींची तरतूद केली आहे. १०० यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये ९ विद्यार्थी हे जिल्हा परिषद शाळेचे असतात. उर्वरित ९१ विद्यार्थी हे विना अनुदानित शाळांमधून येतात. याचाही विचार या निमित्ताने करावा.

गत काळात आपण जिल्ह्यातील १५०० शाळांना ई-लर्निंग सुविधा उपलब्ध करून दिली. आपला विद्यार्थी स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षकांनी विशेष मेहनत घ्यावी, असे आवाहनही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com