Mumbai News: काही दिवसांपासूनच्या सततच्या पावसामुळे ग्रामीण भागातील माळरानावर मोठ्या प्रमाणात गवत उगवले आहे. यामुळे या परिसरातील अनेक आदिवासी लोकवस्तीतील नागरिक त्यांची उपजीविका गवत विकून करीत आहेत. .पावसाळ्यातील चार महिन्यांपैकी दोन महिन्यांत शेती कामांमुळे रोजगार मिळतो, तर उर्वरित दोन महिन्यांत रोजगाराची कमतरता असते. या काळात हिरवे गवत कापून विकल्याने आदिवासी कुटुंबांना संसार चालवण्यासाठी आर्थिक आधार मिळतो..Grass Seed Sale : गवत बिया विक्रीतून दहा लाखांचा नफा.प्रतिवर्षी या माध्यमातून आदिवासींना चांगला रोजगार मिळतो.भिवंडी, अंबाडी, आनगांव, सायवन, टोकरविरा, उसगाव तसेच विक्रमगड व वाडा तालुक्यातील हजारो आदिवासी कुटुंबे उन्हाळ्यातील आठ महिने रोजगारासाठी शहरी भागात स्थलांतर करतात. उर्वरित चार महिन्यांत ते गावी परतून शेती व मजुरी करतात..पावसाळ्यातील शेती संपल्यानंतर माळरानावर उगवलेल्या गवताची विक्रीतून प्रति दिवस ३०० ते ५०० रुपये मिळतात. या हंगामात कुठेही रोजगार उपलब्ध नसताना हिरवे गवत विक्रीतून संसारला चांगला आधार येथील हजारो आदिवासी कुटुंबांना गवताच्या काडीने मिळवून दिला आहे..Durva Grass Health Benefits : गणेश बाप्पाला प्रिय असणाऱ्या दुर्वांचे आरोग्यदायी फायदे.हिरव्या गवताची मागणी मुंबई, वसई, कामन, कल्याण आणि आसपासच्या उपनगरातील म्हशीच्या गोठ्यात मोठ्या प्रमाणावर आहे. व्यापारी आदिवासींकडून गवत विकत घेऊन तबेला मालकांपर्यंत पोहोचवितात. जिल्ह्यातील अनेक तरुण या व्यवसायात उतरले असून गवताची वाहतूक करण्यासाठी ट्रक भाड्याने घेतले जात आहेत..तबेला मालकांकडून मोठी मागणीग्रामीण भागात भातलावणीची कामे संपल्यानंतर येथील मजुरांना काम नसल्याने त्यांच्यावर बेरोजगारीचे संकट ओढावते. मात्र, ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यांच्या कालावधीत ग्रामीण भागातील माळरानावर उगविणाऱ्या हिरव्या गवताला शहरी भागातील म्हशींच्या तबेला मालकांकडून खूप मागणी असते. या मागणीतूनच येथील आदिवासींना चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे. १० किलो वजनाच्या गवताच्या पेंढीला २० ते २५ रुपये दर मिळतो..अनेकांना उपजीविकाआदिवासी भागातील मजुरांना या व्यवसायातून रोजगार, अनेक तरुणांच्या हाताला काम, ट्रक, टेम्पो वाहतुकदारांना रोज वाहन भाडे, तर शहरी भागातील दुभत्या जनावरांना हिरवा चारा अशा माध्यमातून सर्वांचेच हित साधणारा हा व्यवसाय आहे, असे गवत विक्री व्यावसायिक सुनील गहला यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.