Grapes Farming: बदलत्या वातावरणात सावधपणे निर्णय घ्यावेत
Crop Protection: विविध पॉडकास्टवरून मिळालेल्या हवामान माहितीनुसार, शुक्रवारपासून द्राक्ष विभागातील थंडी सौम्य होत जाईल आणि काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. वाढलेली आर्द्रता आणि पानावरील दवामुळे केवडा व बुरशीजन्य करपा रोगाचा धोका वाढतो; मात्र शेतकऱ्यांनी घाबरून न जाता सावधपणे फवारणीचे निर्णय घ्यावेत.