Grape Price Crash: दर पडल्याने अंतिम टप्प्यातील द्राक्ष हंगाम कडू

Grape Season 2025: द्राक्ष उत्पादन घटूनही सुरुवातीला चांगले दर मिळाले; मात्र शेवटच्या टप्प्यात व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे दरात प्रचंड घसरण झाली आहे.
Grape
GrapeAgrowon
Published on
Updated on

Nashik News: सप्टेंबरमध्ये गोडी बहर छाटणीवेळी अतिवृष्टी तर नंतर डिसेंबरमध्ये मॉन्सूनोत्तर पावसाच्या तडाख्यात द्राक्ष बागांचे अतोनात नुकसान झाले. परिणामी, द्राक्ष उत्पादनात यंदा ४० टक्क्यांवर घट आल्याचे समोर आले. मालाची कमी उपलब्धता, त्यात गुणवत्ता व गोडीमुळे दर टिकून होते. मात्र गेल्या १० दिवसांपासून दरात किलोमागे सरासरी १५ ते २० रुपयांपर्यंत घसरण झाल्याने अंतिम टप्प्यात द्राक्ष हंगाम शेतकऱ्यांसाठी कडू ठरत आहे.

देशांतर्गत बाजारपेठ तसेच निर्यातीसाठी द्राक्ष खरेदी सुरू असताना यंदा समाधानकारक दर मिळत होते. उत्पादकता घटल्याने मिळणाऱ्या दरामुळे यंदा शेतकरी समाधानी होता. परिणामी, खुडे जोरात सुरू होते. अनेक ठिकाणी गुणवत्तेच्या मालाच्या खरेदीसाठी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बागात चकरा मारून पेड कटिंगसाठी आग्रही धरल्याचे पाहायला मिळाले. असे चित्र असताना गेल्या १० दिवसांपासून शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी पडले.

Grape
Grape Season Maharashtra : राज्यातील द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्याकडे

मागील सप्ताहात हवामान बदलाच्या पार्श्‍वभूमीवर व्यापाऱ्यांनी दर कमी केले. तर रमजान ईदच्या पार्श्‍वभूमीवर मालाचा पुरवठा न झाल्याने मालाची उपलब्धता वाढली तर पुरवठा कमी झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात हंगाम अंतिम टप्प्यात असून द्राक्षमालाची उपलब्धता कमी आहे, असे असताना व्यापारी मनमानी करत कमी दराने खरेदी करत आहेत. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांच्या अपेक्षित दराच्या तुलनेत सध्याचे दर निम्म्यावर आले आहेत. खरेदीसाठी गुणवत्तापूर्ण मालाचा आग्रह; मात्र तो बेभावात खरेदी अशीच व्यापाऱ्यांची पद्धत असल्याचे शेतकऱ्यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना सांगितले.

Chart
ChartAgrowon

द्राक्ष खरेदीपश्चात विक्री केल्यानंतर अनेक व्यापाऱ्यांना फायदा होतो, त्या वेळी कुणीही फायद्यातील रक्कम शेतकऱ्यांना देत नाही; मात्र आता काही व्यापाऱ्यांनी तोटा झाला, असे सांगून रक्कम किलोमागे ५ ते १५ रुपयांपर्यंत कपात करून पैसे दिले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे.

Grape
Grape Export: द्राक्षपंढरीतून ४० हजार टनांनी निर्यात कमी

...ही आहे परिस्थिती

– खरेदीचा सौदा ठरल्याप्रमाणे पैसे न देता कपात करून रक्कम हातात देण्याचा प्रकार; काही ठिकाणी व्यापारी व शेतकऱ्यांमध्ये वाद

द्राक्ष खरेदी करू; मात्र पट्टीवर माल पाठवून त्यानुसार पैसे देऊ असे व्यापाऱ्यांचे म्हणणे

– बाजारपेठेत मागणी नसल्याने तोटा अशी व्यापाऱ्यांकडून कारणे

द्राक्ष मालाला उठाव नसल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे. मात्र गोडीमुळे स्थानिक बाजारात उठाव आहे, असे असताना शेवटच्या टप्प्यात दर पाडण्याचा प्रकार झाला आहे. दर वाढतील अशी अपेक्षा होती; मात्र या उलट दर पाडण्यात आले. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांशी पारदर्शकपणे व्यवहार केले पाहिजे.
बाळासाहेब गडाख, विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ
मागील आठवड्याच्या तुलनेत किलोमागे दहा रुपयांपर्यंत कमी दराने सध्या द्राक्ष खरेदी सुरू आहे. काही व्यापाऱ्यांनी यापूर्वी सौदे ठरवताना वेगळा दर दिला, तर नंतर पैसे कापून शेतकऱ्यांच्या हातात दिले जात आहेत, ही पद्धत योग्य नाही.
किशोर निफाडे, द्राक्ष उत्पादक शेतकरी, शिरवाडे, ता. निफाड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com