Local Governance: गावांमध्ये दिल्या जात असलेल्या सुविधांच्या मोबदल्यात ग्रामपंचायतींकडून करवसुली केली जात असते. यात प्रामुख्याने घरपट्टी, पाणीपट्टी कराची वसुली केली जात असते. मार्च अखेरपर्यंत ही वसुली जोरात होत असते. दरम्यान, दरवर्षी होत असलेल्या करवुसलीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील ११६० ग्रामपंचायतीकडून घरपट्टी, पाणीपट्टीची आतापर्यंत साधारण ८१ कोटी ५५ लाखांची विक्रमी वसुली झाली आहे..जिल्हा परिषदेंतर्गत यंदा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत शासनाने करवसुलीसाठी मागील थकबाकी भरल्यास ५० टक्के सवलत जाहीर केली आहे. याची मदत थकित करवसुलीसह चालूची कराची वसुली देखील जोरदार होत होण्यास मदत मिळत आहे..Panchayat Raj Abhiyan: पंचायतराज समृद्ध अभियानात सोलापुरातील २५० गावांचा सहभाग.ग्रामपंचायतीकडून जानेवारीपासून वसुली माेहिम सुरू केली जाते. मात्र करवसुली ७० टक्क्यांपेक्षा अधिक जात नाही. यंदा थकबाकीवर ५० टक्के सवलत दिल्याने ३१ डिसेंबरपर्यंत मागील थकबाकी भरल्यास निम्मे थकबाकी भरून थकबाकी निरंक करण्याची संधी दिली होती. त्यामुळे मार्चच्या मध्यावधीत करवसुली ७९ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे..Gram Panchayat Tax Recovery : ग्रामपंचायतीकडून घरपट्टी, पाणीपट्टीची वसुली वेगात सुरू.घर, पाणीपट्टी मिळून ७० टक्के वसुलीजिल्ह्यातील ११६० ग्रामपंचायतींकडून यंदा घरपट्टी व पाणीपट्टीची मोठ्या प्रमाणात वसुली झाली आहे. यात घरपट्टी कराची ५७ कोटी २४ लाख ७ हजार रुपये मागणी असून आतापर्यंत ४५ कोटी २६ लाख ९७ हजार रूपये झाली आहे. १२ कोटी वसुली होणे बाकी आहे. तसेच पाणी पट्टीकरातून देखील ग्रामपंचायती मालामाल झाल्या आहेत. यंदा पाणीपट्टी कराची मागणी ५१ कोटी २१ लाख १३ हजार रुपये होती. त्यापैकी ३६ कोटी २९ लाख ६५ हजार वसुली झाली आहे..चार तालुक्यातून वसुली कमीजिल्ह्यात कराची वसुली ८२ कोटीच्या जवळपास झाली असली तरी अमळनेर, मुक्ताईनगर, पारोळा, रावेर या चार तालुक्यात ७० टक्क्यांपेक्षा कमी आहे. तर धरणगाव, जळगाव, पाचोरा, रावेर, यावल तालुक्यात घरपट्टी ८० टक्क्यांपेक्षा अधिक असून, सर्वाधिक वसुली रावेर तालुक्यात ८९ टक्के झाली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.