
Chh. Sambhajinagar News : महाराष्ट्र राज्याला लाभार्थ्यांचे सुधारित वाटप एनएफएसए अधिनियम-२०१३ अंतर्गत तत्कालीन लोकसंख्येच्या आधारावर ७ कोटी १६ हजार होते. मात्र मागील दशकात वाढलेल्या लोकसंख्येनुसार हे लक्ष्य वाढवून ८ कोटी, २० लाख ६१ हजार लाभार्थी इतके करण्यात यावे, अशी मागणी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री प्रल्हाद जोशी यांची दिल्ली येथे भेट घेऊन केली.
अन्न व नागरी पुरवठा विभाग महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारला २०२१ मध्ये प्रस्ताव दिला असल्याचे लक्षात आणून देत त्यास मान्यता देण्याची मागणीही या वेळी मंत्री मुंडे यांनी केली.
अन्न धान्य वितरण प्रणाली सुरळित करून त्यामधील लहान मोठ्या अडचणी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, याबाबत राज्याचे अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी बुधवारी (ता. २९) नवी दिल्लीत केंद्रीय अन्न व नागरीपुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली.
महाराष्ट्रात वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात एनएफएसए अधिनियम २०१३ नुसार मागील एक दशकात वाढलेल्या लोकसंख्येनुसार लाभार्थी लक्ष्यांक निश्चित करण्यात यावा. ऑनलाइन वितरण प्रणालीमधील लहान-मोठ्या समस्या दूर कराव्यात, ई-पॉस मशिन संदर्भातील तांत्रिक अडचणी दूर करव्यात आदींबाबत मंत्री मुंडे यांनी मंत्री जोशी यांना माहिती दिली.
आरसीएमएस अर्थात शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली संपूर्णत: सुरळीत चालू ठेवण्याबाबत संबंधितांना केंद्र शासन स्तरावरून निर्देश व्हावेत, अशी विनंती मुंडे यांनी केली.
फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाअंतर्गत प्रलंबित परतावे, सीएमआर खरेदीबाबत थकबाकी, जिल्हा पुरवठा अधिकारी यांना विचारात घेऊनच वितरण आदेश बदलणे, रेल्वे रेक दरम्यान अन्नधान्य उचलण्यास एफसीआय दुपारी तीननंतर परवानगी देत नाही, त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कार्यवाही करणे यावर या वेळी चर्चा झाली.
या सर्वच यंत्रणा व राज्य सरकार यांमध्ये लवकरच एक बैठक आयोजित करून याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन राज्य सरकारला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिल्याची माहिती मंत्री मुंडे यांच्या वतीने देण्यात आली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.