Nandurbar News: शासनाच्या रब्बी हंगाम ई-पीक पाहणीला सुरुवात झाली असून, सातबारा उताऱ्यावर पीकपेरा स्वतः शेतकऱ्यांनी करायचा आहे. पीक पाहणी करण्याची अंतिम तारीख २४ जानेवारी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन प्रभारी तहसीलदार शैलेंद्र गवते यांनी केले आहे..शहादा तालुक्यात रब्बी हंगाम २०२५ साठी ई-पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्वेअंतर्गत अद्यापपर्यंत एक हजार ९६ प्लॉटवर संबंधित शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी डीसीएस व्हर्जन ४.०.५ या मोबाईल अॅपद्वारे आपल्या सातबारावर पिकाची नोंदणी केली आहे. सद्यःस्थितीत तालुक्यात डिजिटल क्रॉप सर्वे अंतर्गत ई-पीक पाहणीची नोंदणी अत्यल्प झाली आहे. उर्वरित सर्व शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी अॅपद्वारे करण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले आहे..E-Crop Survey: रब्बीची ई- पीक पाहणी नोंदणी चोवीस जानेवारीपूर्वी करावी.मोबाईल ॲपवर नोंदणीनोंदणीसाठीचे अॅप गुगल क्रोम अपडेट करून मोबाइलमध्ये इन्स्टॉल करून घ्यावे. तसेच ई-पीक पाहणी प्रत्यक्ष शेत बांधावर जाऊन अपलोड करावी. याकामी संबंधित शेतकऱ्यांजवळ मोबाईल नसल्यास अथवा हाताळता येत नसल्यास संबंधित गावाचे ग्राममहसूल अधिकारी, महसूलसेवक, तसेच संबंधित गावात नियुक्त केलेले सहायक यांची मदत घेऊन आपल्या पिकांची नोंदणी करून घ्यावी..E Crop Survey: रब्बीतील ४१ हजार हेक्टर क्षेत्रावरील ई पीक पाहणी.या अॅपविषयी काही अडचण असल्यास संबंधित गावाचे ग्राममहसूल अधिकारी, तसेच कॉमन सर्व्हिस सेंटर व आपल्या गावातील डीसीएसकरिता नियुक्त सहायक यांची मदत घ्यावी, असे कळविण्यात आले आहे..अचूक नोंद आवश्यकई-पीक पाहणीद्वारे पिकाची नोंदणी न केल्यास आपल्या सातबारावर पीक पेरा कोरा राहील व पीक पेरानंतर भरता येत नाही. त्यामुळे पीक, विमा, इतर शासकीय अनुदान व लाभ मिळविण्यास अडचण निर्माण होईल. अवेळी पाऊस किंवा इतर नैसर्गिक आपत्तीबाबत पीकविमा मिळण्यासाठी सातबारा उताऱ्यावर अचूक पीक नोंद असणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने सर्व शेतकरी बांधवांनी २४ जानेवारीपूर्वी आपल्या रब्बी हंगामातील पिकांची नोंदणी करून घेण्यात यावी, असे आवाहन प्रभारी तहसीलदार शैलेंद्र गवते यांनी केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.