Crop Damage Update : सरकारने शेतकऱ्यांसाठी ठोस भूमिका जाहीर करावी

Unseasonal Rain Update : शेतीमालाचे भाव सातत्याने ढासळत आहेत. गारपीट व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

Nashik News : शेतीमालाचे भाव सातत्याने ढासळत आहेत. गारपीट व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. त्यात जिल्हा बँकेची सक्तीची वसुली, अशी विविध संकटे शेतकऱ्यांच्या समोर आहेत. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार फक्त घोषणाबाजी करून बळीराजाची क्रूर थट्टा करीत आहे.

त्यामुळे आठ दिवसात राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी ठोस भूमिका जाहीर करावी, अन्यथा राज्यकर्त्यांना गावबंदी करून तालुका-तालुक्यात जनआंदोलन उभारण्याचा इशारा शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देविदास पवार यांनी दिला.

Crop Damage
Chalisgaon APMC Result : चाळीसगाव बाजार समिती सभापतिपदासाठी चुरस

येथील सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या वेळी ते बोलत होते.

जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, संघटना युवा अध्यक्ष किरण पाटील, जिल्हा उपाध्यक्ष शैलेंद्र कापडणीस, बागलाण तालुका अध्यक्ष बाळासाहेब चौधरी आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, की नाशिक जिल्ह्यात कांदा पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. जिल्ह्यात शेतकरी डाळिंब, द्राक्षांसह फळबागांचीही मोठ्या प्रमाणात लागवड करतो.

राज्याला भाजीपाला पुरवणारा जिल्ह्यातील शेतकरी पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यात विशेषत: बागलाण तालुक्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे सर्वच पिके उद्ध्वस्त झाली आहेत. नुकसानीमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला. सरकारने घोषणांचा पाऊस पाडला. मात्र अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही.

दरम्यान, बैठकीत शासनाने कांद्याला एकरी ५० हजार रुपयांची तातडीने मदत द्यावी, कांदा प्रति किलो २५ रुपये दराने खरेदी करावा, जिल्हा बँकेची सक्तीची कर्जवसुली थांबवावी व राष्ट्रीय बँकेप्रमाणे तडजोड करावी या मागण्यांची पूर्तता करावी यासाठी शासनाला आठ दिवसांची मुदत देण्यात आली.

बैठकीस देवळा तालुकाध्यक्ष माणिक निकम, कळवण तालुकाध्यक्ष बाळासाहेब शेवाळे, शांताराम जाधव, मोहन जाधव आदींसह जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com