Fertilizer Subsidy : खत अनुदान वितरणासाठी आता ई-बिल प्रणाली; अनुदानातील गैरव्यवहार टाळता येणार
E Bill System : या प्रणालीमुळे दरवर्षी सुमारे २ लाख कोटी रुपयांच्या खत अनुदानाचे वितरण पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणार आहे. ही प्रणाली लागू झाल्याने खत अनुदानाशी संबंधित संपूर्ण आर्थिक प्रक्रिया अधिक पारदर्शक, वेगवान आणि सुरक्षित होणार असल्याचा केंद्र सरकारचा दावा आहे.