Beed News: बीड जिल्ह्याच्या विकासासाठी शासन पूर्ण प्रयत्न करत आहे. पुढील काळात विकासाची ही गंगा वाहती रहावी यासाठी भगीरथ प्रयत्न सुरू आहेत. त्याला नागरिकांनी देखील साथ द्यावी, असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले. .७७ वा प्रजासत्ताक दिनी मुख्य शासकीय ध्वजवंदन सोहळा त्यांच्या हस्ते पार पडला, त्या वेळी ते बोलत होते. पोलिस कवायत मैदानावर झालेल्या सोहळ्यात ५००० शालेय विद्यार्थ्यांच्या समूहाने केलेल्या कवायती, लेझीम, प्रात्यक्षिके पोलिस दलाच्या श्वान पथकाने केलेली प्रात्यक्षिके आदींनी हा सोहळा रंगत गेला..Beed Development : बीडच्या विकासासाठी २१९ कोटींचा निधीला मान्यता.सहकार मंत्री पाटील म्हणाले, ‘‘भौगोलिकदृष्ट्या राज्याच्या केंद्रस्थानी असणारा बीड जिल्हा आगामी काळात विकासाचेही मोठे केंद्र ठरावे यासाठी शासन प्रयत्न करित आहे. बीडकरांचे रेल्वेचे स्वप्न आता पूर्णत्वास आले आहे. ही रेल्वे परळी वैजनाथपर्यंत नेण्याचे काम सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजनातून विमानतळ उभारणीच्या कामाला गती देण्यात आली आहे. मनुष्यबळ विकासासाठी आणि शेतीवर अवलंबून असलेल्या या जिल्ह्यात शेती विकासाकरिता शासनाने प्राधान्य दिले आहे..Beed Development : बीडच्या विकासकामांचा अजित पवारांनी घेतला आढावा.यंदाच्या आर्थिक वर्षात ५७५ कोटींचा जिल्हा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी ५३९ कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता देखील देण्यात आली आहे. सहकार विषयक कार्यालये एकाच इमारतीत असावीत या भूमिकेतून शहरात मध्यवर्ती भागात १४ कोटी ९८ लक्ष रुपये किमतीच्या मान्यतेसह चार मजली अद्ययावत इमारतीचे भूमीपूजन नववर्षदिनी करण्यात आले. जिल्ह्यात १० कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यरत आहेत. नोंदणीकृत सहकारी संस्थांची संख्या ३ हजारांहून अधिक आहेत. .एकूण पीककर्ज वाटपापैकी ७५ टक्के वाटप माझ्या सहकार विभागाने केले. जिल्ह्यातील १० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती मदत म्हणून ७५० कोटी ४० हजार इतकी विशेष अनुदान रक्कम मंजूर केले. ९ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट ६२४ कोटी ५५ लाख रुपये रक्कम जमा झाली. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या ८८७९७४ शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचे पेरणी करिता ७०८ कोटी ८ लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले..त्यापैकी ८०७७८१ इतक्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ६३१ कोटी ९१ लाख रुपये वर्ग करण्यात आले. उर्वरित शेतकऱ्यांचे अनुदान वाटपाचे काम सुरू आहे. ११७९ पोलिस पाटील पदे भरण्याची जम्बो भरती मोहीम सुरू आहे. यासाठी ३० पर्यंत अर्ज करता येणार आहेत. पोलिस दलास बळकटीसाठी ११ कोटी ३३ लाख ३९ हजार इतका विशेष निधी देण्यात आला आहे.’’.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.