Kharif MSP 2024: कापसाच्या हमीभावात ५०१, सोयाबीनमध्ये २९२ आणि तुरीच्या हमीभावात ५५० रुपयांची वाढ; नव्या हंगामातील पिकांचे हमीभाव काय?

Cotton, Soybean MSP 2024: सरकारने हमीभावातून सोयाबीन उत्पादकांची नाराजी केली. तर कापूस, तूर आणि उडीद उत्पादकांना काहीसा दिलासा दिला. इतर पिकांचे हमीभावही जेमतेम वाढविण्यात आले.
MSP 2024
MSP 2024MSP 2024

पुणेः केंद्र सरकारने सोयाबीनच्या हमीभावात केवळ २९२ रुपयांची वाढ करून २०२४-२५ साठी ४ हजार ८९२ रुपये हमीभाव जाहीर केला. तर कापसाच्या हमीभावात ५०१ रुपयांची वाढ केली. नव्या हंगामात आता मध्यम धाग्याच्या कापसासाठी ७ हजार १२१ रुपये आणि लांब धाग्याच्या कापसासाठी ७ हजार ५२१ रुपय हमीभाव जाहीर केला. तसेच तुरीच्या हमीभावात ५५० रुपये आणि उडदात ४५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीत सरकारला चांगलाच इंगा दाखवला होता. शेतकऱ्यांना खूष करण्यासाठी सरकार निर्णय घेईल, अशी चर्चा होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान हेही असे भासवत होते. सरकार खाद्यतेल आणि कडधान्य उत्पादनात आत्मनिर्भर होण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देतील आणि हमीभावात चांगली वाढ करतील, अशी शक्यताही व्यक्त केली जात होती. पण सरकारने सोयाबीन उत्पादकांची नाराजीच केली असे म्हणावे लागले. 

केंद्र सरकारने बुधवारी (ता.१९) खरिपातील १४ पिकांचा हमीभाव जाहीर केले. सरकारने तुरीच्या हमीभावात ५५० रुपयांची वाढ केली. आता नव्या हंगामात तुरीचा हमीभाव ७ हजार ५५० रुपये असेल. मागच्या हंगामात ७ हजार हमीभाव होता. तर मुगाच्या हमीभावात केवळ १२४ रुपये वाढ करून ८ हजार ६८२ रुपये केला. उडदाचा हमीभाव ४५० रुपयांची वाढ केली. उडदाला आता ७ हजार ४०० रुपये हमीभाव असेल. 

सोयाबीन उत्पादकांची नाराजी
सोयाबीनचा उत्पादन खर्च वाढल्याने सोयाबीनला किमान ६ हजारांचा हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी करत होते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पंतप्रधान मोदींकडे ५ हजार १०० रुपये हमीभावाची मागणी केल्याचे सांगत होते. त्यामुळे किमान एवढा हमीभाव मिळेल, अशी अपेक्षा होती. पण सरकारने केवळ २९२ रुपयांची वाढ केली आणि ४ हजार ८९२ रुपये हमीभाव जाहीर केला. त्यामुळे सरकारने सोयाबीन उत्पादकांना नाराज केले, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

पीकनिहाय २०२४-२५ साठीचे हमीभाव
पीक...२०२४-२५...२०२३-२४... वाढ
कापूस मध्यम धागा...७१२१...६६२०...५०१

कापूस लांब धागा...७५२१...७०२०...५०१
सोयाबीन...४८९२...४६००...२९२
तूर...७५५०...७०००...५५०

मगू...८६८२...८५५८...१२४

उडीद...७४००...६९५०...४५०
मका...२२२५...२०९०...१३५
ज्वारी हायब्रीड ...३३७१...३१८०...१९१

ज्वारी मालदांडी...३४२१...३२२५...१९६

बाजरी...२६२५...२५००...१२५

रागी...४२९०...३८४६...४४४

भात साधारण ग्रेड...२३००...२१८३...११७

भात ए ग्रेड...२३२०...२२०३...११७

भुईमूग...६७८३...६३७७...४०६

सूर्यफुल...७२८०...६७६०...५२०

तीळ...९२६७...८६३५...६३२

कारळे...८७१७...७७३४...९८३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com