Irrigation Subsidy : ठिबक सिंचनचे २३ कोटींचे अनुदान रखडले

Drip Irrigation : ठिबक सिंचन योजनेचे जिल्ह्यासाठीचे २३ कोटी ५० लाखांचे अनुदान रखडले होते. त्यापैकी सात कोटी तीन लाखांचे अनुदान आतापर्यंत मिळाले आहे.
Drip Irrigation
Drip IrrigationAgrowon
Published on
Updated on

Solapur News : ठिबक सिंचन योजनेचे जिल्ह्यासाठीचे २३ कोटी ५० लाखांचे अनुदान रखडले होते. त्यापैकी सात कोटी तीन लाखांचे अनुदान आतापर्यंत मिळाले आहे. त्याची वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. उर्वरित लाभार्थ्यांना अनुदान वाटपासाठी आणखी १६ कोटी ३९ लाखांचे मिळणे अपेक्षित आहे.

केंद्र सरकारकडून राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत प्रतिथेंब अधिक पीक उत्पादनाकरिता सूक्ष्म सिंचनासाठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. केंद्राकडून अनुदान मिळाल्यानंतर त्यात राज्याचा हिस्सा जमा करून डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा केले जाते. राज्य सरकारने २०२३ - २४ या वर्षात मागेल त्याला ठिबक सिंचन योजना राबविली होती.

Drip Irrigation
Drip Irrigation Subsidy : ठिबकच्या थकीत अनुदानासाठी जिल्हा कृषी कार्यालयास ठोकले टाळे

त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर या योजनेत सहभाग घेतला. यात सोलापूर जिल्ह्यातील सात हजारांहून अधिक शेतकऱ्यांसह राज्यातील सुमारे एक लाख ३० हजार शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. मात्र, शेतकऱ्यांच्या अनुदानापोटी ७१६ कोटी रुपयांचा निधी थकला. केंद्राकडून ३०० कोटींचे अनुदान मिळाले.

Drip Irrigation
Drip Irrigation Subsidy : जळगावात ठिबक संचाचे अनुदान वितरण रखडले

पण, लाभार्थ्यांची संख्या अचानक वाढल्यामुळे तो निधी कमी पडला आणि मागेल त्याला ठिबक सिंचन योजनेला मिळालेल्या प्रतिसादाच्या तुलनेत राज्याने तितक्या अनुदानाची तरतूद केली नव्हती. परिणामी अनुदान रखडले. आता सोलापूर जिल्ह्याला सात कोटी तीन लाखांसह राज्याला २१३ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्याच्या वितरणाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

जिल्ह्यातील अनुदानाची स्थिती

एकूण लाभार्थी ७ हजार ६२६

एकूण अनुदान २३ कोटी ४२ लाख

प्राप्त अनुदान ७ कोटी ३ लाख

लाभार्थी शेतकरी २ हजार ५२ शेतकरी

प्रलंबित लाभार्थी ५ हजार ५४७

अनुदानाची गरज १६ कोटी ३९ लाख

अनुदान थकल्याने मंदावला वेग

अनुदान थकल्याने मंदावला वेग

ठिबकचे अनुदान थकल्यामुळे यंदा २०२४ - २५ मध्ये योजनेची अंमलबजावणी झाली नाही. शिवाय गतवर्षीचेच अनुदान न मिळाल्याने राज्यभरात ठिबक संच देणाऱ्या डीलर व वितरकांनी पोर्टलवर नोंदणी केली नाही. विशेषतः फळपिकांसाठी सूक्ष्म सिंचनाची गरज असूनही शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही. राज्य सरकारच्या धोरणातील सातत्याच्या अभावामुळे सूक्ष्म सिंचनाचा वेग मंदावला.

ठिबक सिंचन योजनेच्या थकीत अनुदानापोटी सात कोटी तीन लाखांचा निधी मिळाला आहे. थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. उर्वरित अनुदान मिळाल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल.
- शुक्राचार्य भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com