Ahilyanagar News: अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुतांश भागात यंदा पाण्याची बऱ्यापैकी उपलब्धता असल्याने शेतकऱ्यांचा ऊस लागवडीकडे कल असल्याचे दिसून येत आहे. सध्या अनेक भागात ऊस लागवडी सुरू असून या वर्षी मजुरी आणि उसाच्या बेण्याचे दर वाढल्याचे दिसून येत आहे. .राहुरी, नेवासा, राहाता, संगमनेर, श्रीगोंदा, कोपरगाव, पारनेर, शेवगाव, अहिल्यानगर तालुक्यांत धरणाचे तसेच नदीच्या परिसरात पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी उसाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त केला जात आहे..Sugarcane Crushing: सव्वा कोटी उसाचे गाळप.जिल्ह्यात यंदा मे महिन्यापासून पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने खरिपात पिके चांगली होती. मात्र मात्र अतिवृष्टी व नद्यांना आलेल्या पुरामुळे खरिपाचे मोठे नुकसान झाले. असे असले तरी जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा, निळवंडे, तसेच पुणे जिल्ह्यातील कुकडीच्या कार्यक्षेत्रात पाणी बऱ्यापैकी उपलब्ध झाले..गाव तलाव, पाझर तलाव व स्थानिक पातळीवर अन्य स्रोतालाही बऱ्यापैकी पाणी उपलब्ध झाले. जायकवाडी धरणासह नद्या-नाल्यांवरील बंधारे भरल्याने नेवासा, शेवगाव तालुक्यातील विहिरी व कूपनलिकांना झाला असून पाण्याची उपलब्धता वाढली आहे. कर्जत, श्रीगोंद्यातील सीना, भीमा नदीपट्ट्यात पाणी मुबलक उपलब्धता आहे..Sugarcane Cultivation: आजरा तालुक्यात उसाची १९०० हेक्टरवर लागवड .त्यामुळे शेतकऱ्यांचा यंदा पिकांना फाटा देत ऊस पिकांकडे कल असल्याचे दिसून येत आहे. लागवडीमुळे उसाच्या बेण्याला मागणी वाढली असून यंदा साडेतीन हजार रुपये टनांपर्यत उसाच्या बेण्यांचा दर आहे. हे बेणे दोन वर्षापूर्वी आडीच हजार रुपये टनांच्या आत होते. लागवडीसाठी मजुरांचीही टंचाई भासत आहे..ऊस लागवडीसाठी प्रतिएकरासाठी ८ ते १० हजार रुपये मजुरी द्यावी लागत आहे. पूर्वी ही मजुरी सात हजारांच्या जवळपास होती. यंदा अतिवृष्टीत इतर पिकांच्या तुलनते उसाचे नुकसान कमी झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचा यंदा तरी जिल्ह्यात ऊस लागवडीकडे कल असल्याचे दिसून येत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.