Persimmon Fruit : आरोग्‍यवर्धक पर्सिमन फळांची भुरळ

Washi APMC : मानवी आहारात फळांचे विशेष महत्त्व आहे. फळांच्या सेवनाने आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. विविध गुणधर्म असलेली फळे बाजारात उपलब्ध असताना सध्या असेच एक आरोग्‍यवर्धक फळ नागरिकांना भुरळ घालत आहे.
Persimmon Fruit
Persimmon FruitAgrowon
Published on
Updated on

Washi News : मानवी आहारात फळांचे विशेष महत्त्व आहे. फळांच्या सेवनाने आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. विविध गुणधर्म असलेली फळे बाजारात उपलब्ध असताना सध्या असेच एक आरोग्‍यवर्धक फळ नागरिकांना भुरळ घालत आहे. या फळाला मराठीत टेंभूर्णी, हिंदीत अमर फळ; तर इंग्रजीत पर्सिमन फ्रूट म्हणतात. हे फळ खाण्याचे अनेक फायदे असल्याने नागरिकांची पसंती मिळत आहे.

वाशीतील एपीएमसी फळ बाजार सध्या पर्सिमन फळांनी चांगलाच बहरला आहे. एपीएमसीच्या घाऊक बाजारात दररोज दोन ते तीन ट्रक पर्सिमन फळे येत असून शनिवारी बाजारात ५० क्विंटल फळांची आवक झाली. सध्या आकारमानानुसार या फळांना घाऊक बाजारात किलोला ८० ते २०० रुपये भाव मिळत आहे.

टोमॅटो आणि ढोबळी मिरचीच्या आकाराचे फळ संत्र्यासारखे नारंगी रंगाचे आहे. चवीला मधूर आणि आरोग्यदायी असल्याने ग्राहकांकडून विशेष मागणी आहे. हे फळ सफरचंदाला उत्तम पर्याय असल्याचे व्यापारी सांगतात.

Persimmon Fruit
Golden Sitafal : गोल्डन सीताफळाकडे ग्राहकांची पाठ

थंड हवेच्या प्रदेशात या फळाची चांगली वाढ होते. साधारणतः नोव्हेंबर ते डिसेंबर आणि जानेवारीचा काही काळ पर्सिमन फळांचा हंगाम असतो. सध्या एपीएमसीत आलेली पर्सिमन फळे ही हिमाचल प्रदेश येथील कुल्लू-मनाली भागातून येत आहेत.

Persimmon Fruit
Washi APMC : वाशी बाजार समितीत स्‍ट्रॉबेरी प्रतिकिलो ४५० रुपये

आरोग्यदायी फायदे

पर्सिमन फळात मोठ्या प्रमाणात पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, कॉपर, मॅगनिजचा साठा असून सी, ई, बी, यांसारखी जीवनसत्वे मुबलक प्रमाणात आहेत. यात मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असून ते खाल्ल्याने हृदयविकाराशी निगडित आजारांचा धोका कमी होतो. शिवाय फायबर पचनक्रिया सुधारण्यास उपयुक्‍त ठरते.

सध्या बाजारात पर्सिमन फळांची आवक चांगली असून चांगला भाव मिळत आहे. भारतात हे फळ मागील सहा ते सात वर्षांपासून विक्रीस येत आहे. हे फळ चवीला आंब्यासारखे गोड असल्याने आणि आरोग्यदायी फायदे पाहून ग्राहकांची पसंती मिळत आहे. सध्या फळांची आवक होण्यास सुरुवात झाली असून भाव चढे आहेत. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत भाव कमी होण्याची शक्यता आहे.
- करण वसंदानी, फळविक्रेते, एपीएमसी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com