Chandrapur News : अतिवृष्टिग्रस्तांच्या यादीतून राजुरा मतदारसंघातील गोंडपिंपरी तालुक्याला वगळण्यात आले होते. त्यानंतर जनसामान्यांमध्ये चांगलाच रोष निर्माण झाला होता. त्याची दखल घेत आमदार देवराव भोंगळे यांनी या संदर्भाने शासन स्तरावर पाठपुरावा केला. त्याअंती अखेरीस गोंडपिंपरी तालुक्याचा समावेश भरपाई यादीत करण्यात आला आहे. .गोंडपिपरी तालुक्याला अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित करण्यात आले. यामुळे तालुक्यातील शेतकरी बांधवांत तीव्र नाराजी होती. हा कळीचा मुद्दा लक्षात घेता आमदार देवराव भोंगळे यांनी याबाबत अतिशय संवेदनशीलता बाळगली. त्यांनी तातडीने याबाबत पाठपुरावा सुरू केला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री बावणकुळे, प्रधान सचिव यांना पत्र देत त्यांच्या लक्षात हा मुद्दा आणून दिला..Crop Damage: मॉन्सूनोत्तर पावसामुळे उरल्यासुरल्या पिकांची नासाडी.दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने प्रशासकीय यंत्रणा ठप्प होती. यानंतर आमदार देवराव भोंगळे यांनी मंत्रालय गाठले. अखेरीस त्यांच्या प्रयत्नांना यश येत गोंडपिपरी तालुक्याचा समावेश भरपाईचे यादी करण्यात आला. राज्यातून अनेक तालुके वगळले गेले असले तरी त्यापैकी पुन्हा समावेश झालेला गोंडपिपरी तालुका हा एकमेव ठरला आहे. .Crop Damage : रब्बी पेरणी, कपाशी, भाजीपाल्याला पावसाचा फटका.महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विशेष सहकार्याने हे शक्य झाले. त्यानंतर गोंडपिपरी येथे भाजप कार्यालयात यासंदर्भातील माहिती देण्यात आली. यावेळी गोंडपिपरी भाजपचे तालुकाध्यक्ष दिपक सातपुते, माजी जिल्हा परिषद सदस्य अमर बोडलावार, चेतन गौर, राकेश पून, नीलेश पुलगमकर, भानेश येग्गेवार, गणेश मेरूगवार, रमेश दिनगलवार, हिराचंद कंदकुरीवार,दत्तुजी धुडसे यांची उपस्थिती होती..शेतकरी बांधवांच्या हितासाठी आपण सदैव कटिबद्ध आहोत. आता अतिवृष्टीच्या यादीत गोंडपिपरी तालुक्याचा समावेश करण्यात यश आले आहे. यामुळे आमच्या गोंडपिपरी तालुक्यातील हजारो शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळेल.- देवराव भोंगळे, आमदार, राजुरा विधानसभा क्षेत्र.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.