Warehouse Shortage: गोंदिया जिल्ह्यातील शासकीय गोदामे क्षमतेपेक्षा भरल्याने तब्बल १३ लाख ५० हजार क्विंटल धानाची उचल रखडली असून, खरेदी संस्थांवर मोठा ताण निर्माण झाला आहे. परिणामी, रब्बी हंगामातील धान खरेदी प्रक्रियेवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे..खरीप हंगामात जिल्ह्यातील शासकीय धान खरेदी केंद्रांवर मोठ्या प्रमाणात धानाची आवक झाली. यामध्ये २५ लाख १२ हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. खरेदी केलेल्या धानाची राइस मिलर्सकडे भरणा करून तांदूळ शासनाकडे जमा करण्याची प्रक्रिया सुरू असली, तरी गोदामांमध्ये जागेअभावी ही प्रक्रिया मंदावली आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनमार्फत खरेदी केलेल्या धानापैकी १३ लाख ५० हजार क्विंटल धान भरणीच्या प्रतीक्षेत केंद्रांवर पडून आहे. .Daund Farmer Protest: वरवंडकरांचे पाण्यासाठी आंदोलन.आतापर्यंत केवळ १२ लाख ४२ हजार क्विंटल धानाची भरणी पूर्ण झाली असून, उर्वरित धानाची उचल अद्याप झालेली नाही. दरम्यान, जिल्ह्यात खरीपसह रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी शासनाने ६ लाख १७ हजार क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र खरिपातील धानाची उचल न झाल्याने रब्बीतील खरेदी प्रक्रियेलाही अडथळे निर्माण झाले आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मळणी केलेल्या तांदळाच्या साठवणुकीसाठी गोदामे अपुरी पडत आहेत. .Water Scarcity: पेठ तालुक्यात पाणीटंचाई, तातडीने टँकर सुरू करा : खासदार भगरे.गोदामात जागा उपलब्ध नसल्याने मळणी प्रक्रियेत विलंब होत असून, याचा थेट परिणाम वाहतूक व राइस मिलर्सवरही होत आहे. भरणी केलेला तांदूळ वेळेत उचलला जात नसल्याने वाहतूक खर्च वाढत आहे. याशिवाय, धान विक्रीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया सुरू असून, आतापर्यंत सुमारे २० हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. अद्याप अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित असल्याने नोंदणीला मुदतवाढ देण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे..धान खरेदी मर्यादेत अखेर वाढशासकीय खरेदी संस्थांमार्फत आता प्रति हेक्टरी ४९.४० क्विंटल (प्रति एकरी २० क्विंटल) धान खरेदीची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा मानला जात असून, या विषयावर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रशासनाला वारंवार निवेदन देत आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता..या संदर्भात भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी या विषयावर सातत्याने पाठपुरावा केला होता. तसेच आमदार नाना पटोले, माजी आमदार दिलीप बन्सोड तसेच विविध सेलचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांनी या विषयावर आंदोलनही केले होते. या एकत्रित प्रयत्नांमुळेच अखेरीस धान खरेदीची मर्यादा वाढविण्यात आली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.