Gondiya News: गोंदिया जिल्ह्यात खरीप हंगामात करण्यात आलेल्या धान खरेदीचे तब्बल ३१३ कोटी रुपयांचे चुकारे अद्यापही प्रलंबित असल्याने सुमारे ४० हजार शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. धान विक्री करूनही मागील काही महिन्यांपासून रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांची कर्जफेड, घरखर्च व पुढील हंगामाची तयारी अडचणीत आली आहे..सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा मार्केटिंग फेडरेशनमार्फत आतापर्यंत २५ लाख ३३ हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आली असून, त्याची एकूण किंमत सुमारे ६०० कोटी १७ लाख रुपये इतकी आहे. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली रक्कम यापेक्षा खूपच कमी असून मोठा हिस्सा थकित आहे..Paddy Procurement: धान खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण.शासन स्तरावरून केवळ २८६ कोटी रुपयांचे चुकारे देण्यात आले असून, तब्बल ३१३ कोटी रुपयांचे चुकारे थकल्याने चाळीस हजारांवर शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. धान विक्रीसाठी १ लाख ३२ हजार ६१४ शेतकऱ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी ८० हजार ६१६ शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष धान विक्री केली. मात्र वेळेत चुकारे न मिळाल्याने ग्रामीण भागात नाराजीचे वातावरण आहे..दरम्यान, शासनाकडून खरेदी उद्दिष्ट वाढविण्याची घोषणा झाली असली, तरी आधीचे पैसे मिळतील की नाही याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. अजूनही ५१ हजारांहून अधिक शेतकरी धान विक्रीच्या प्रतीक्षेत असल्याने येत्या काळात खरेदीचा दबाव वाढण्याची शक्यता आहे..Paddy Procurement: भात खरेदीसाठी ओलावा निकषांत शिथिलता नाही, तामिळनाडूची मागणी केंद्राने फेटाळली.सोबतच वेळेत चुकारे न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा शेतकरी संघटनांकडून दिला जात असून, प्रशासनाने तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरत आहे. अन्यथा, धान उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी आणखी तीव्र होण्याची भीती व्यक्त होत आहे..३५ लाख क्विंटल धान खरेदीची शक्यतागेल्या खरीप हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने २५ लाख क्विंटल धान खरेदी केली होती. तर यंदा आतापर्यंत २५ लाख ३३ हजार खरेदी झाली आहे. त्यानंतरही ५१ हजार ९९८ शेतकरी धान विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे यंदा ३५ लाख क्विंटलहून अधिक धान खरेदी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.