Reality of Agricultural Migrant Families: हळूहळू फेब्रुवारी संपला. ऊस तोडीचा हंगाम संपायला आला. हिशेब अंतिम करायला सुरुवात झाली आणि पाहता पाहता शनिवारपर्यंत पाव्हणं चंबुगबाळं आवरून गोंदणवाडीला निघून गेली. देवळाजवळची जागा पुन्हा रिकामी झाली. एक भारद्वाज रिकाम्या झोपड्यांच्या जागेवर झालेल्या मुंग्या टिपत होता.