Pune News: भीमाशंकरमध्ये स्ट्रॉबेरी क्लस्टर यशस्वी होत असताना, त्याच्या अनुभवावर आता गोल्डन बेरी लागवडीचाही यशस्वी प्रयोग येथील शेतकरी करू लागला आहे. तरूण शेतकरी गौरव बबन गभाले (रा. फुलवडे) यांनी प्रायोगिक तत्त्वावर लागवड केलेल्या गोल्डन बेरीचे उत्पादन सुरू झाले आहे..या यशस्वी प्रयत्नांनंतर आता भविष्यात स्ट्रॉबेरीसह गोल्डन बेरीचेही क्लस्टर साकारण्यास प्रोत्साहन मिळणार आहे. या प्रयोगाबाबत गभाले म्हणाले,‘‘महाबळेश्वर येथून २०० रुपये दराने २ पणेट आणून ५०० रोपे तयार केली..Agriculture Innovation: तंत्रज्ञान शेतीपर्यंत पोहोचणे आवश्यक : संजय किर्लोस्कर.बेड पद्धतीचा वापर करून, मल्चिंग पेपर वापरून या रोपांची दीड ते दोन फूट अंतरावर लागवड केली. लागवडीनंतर स्ट्रॉबेरीस खते, औषधांचा डोस देण्यात आला आणि सुमारे दोन महिन्यांत फळधारणा सुरू झाली. एकूण ५ गुंठे क्षेत्रात स्ट्रॉबेरी व गोल्डन बेरी या दोन्ही पिकांसाठी ४५ हजार रूपये लागवड खर्च आला..गोल्डन बेरीची वैशिष्ट्येसहा महिने सलग उत्पादन मिळते.नगदी पीकपोषक घटक भरपूरकमी क्षेत्रात जास्त उत्पन्नदुर्गम भागासाठी उपयुक्त.Agriculture Innovation: ‘शेतकरी-शास्त्रज्ञांचा दुवा अधिक मजबूत करणारा उपक्रम’....असा होतो वापरफळ झाडावर असताना कागदासारखे कवच असते. कवच काढल्यानंतर आत पोपटी नारंगी रंगाचे आकर्षक फळ दिसते. या फळांचा वापर स्मुदीज, सॅलड, जॅम तसेच मिठाईत केला जातो. फायबरचे प्रमाण जास्त असल्याने सुरुवातीला मर्यादित प्रमाणात सेवन करावे, असा सल्ला तज्ज्ञ देतात..स्ट्रॉबेरीनंतर आता शेतकरी गोल्डन बेरीचे उत्पादन घेऊ लागले आहेत. भविष्यात शेतकऱ्यांना अधिक तांत्रिक सल्ला मार्गदर्शन करण्यावर कृषी विभागाचा भर असणार आहे. नव्या पीकपद्धतीमुळे इतर शेतकरीही गोल्डन बेरी साठी उत्सुक झाले आहेत. अरविंद मोहरे, सहायक कृषी अधिकारी, आंबेगाव.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.