डॉ. हमीद दाभोलकरLaw And Order: Social Issuesत्यासाठी या खरात प्रकरणात सहभागी असलेल्या राजकारणी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यावर कठोर करवाई होणे आवश्यक आहे..ज्योतिषी- बाबा-बुवा आणि राजकारणी-सरकारी अधिकारी-धनदांडग्या प्रभावशाली व्यक्ती यांची साठगाठ किती भयानक शोषणकारी असते याचे हादरवून टाकणारे चित्र ज्योतिषी अशोक खरातच्या प्रकरणातून पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या समोर आले आहे. या प्रकरणाचा निःपक्षपाती तपास होऊन गुन्हेगारांना शासन झालेच पाहिजे. प्रत्यक्षात आपल्या समाजात अशा स्वरूपाची प्रकरणे चार, आठ दिवस माध्यमांमध्ये चर्चेत राहतात आणि मग त्यांच्या विषयी सर्व समाजभावना विझून जाते. थोड्या दिवसांनी पहिले पाढे पंचावन्न, अशी परिस्थिती निर्माण होते. खरात प्रकरणाच्या नंतर तसेच पुन्हा असे प्रकार घडू नयेत यासाठी भोंदुगिरी रोखण्यासाठी कालबद्ध कृती कार्यक्रम आखणे आवश्यक आहे त्यासाठी पुढील मुद्द्यांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे.Social Issues : आपली मुलं आपली जबाबदारी .अंधश्रद्धा निर्मूलन कक्षप्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कक्षाची स्थापना करण्याचा शासन निर्णय आहे. हे अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष प्रत्यक्ष कार्यान्वित करणे आवश्यक आहे. पत्रकार, महिला, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील कार्यकर्त्यांना सदर अंधश्रद्धा निर्मूलन कक्षाचे सदस्य म्हणून जोडून घेऊन त्यांच्या नियमित बैठका झाल्या तर परिसरात चालणारे अघोरी प्रकार वेळीच समोर येतील व त्यांना पायबंद घालता येईल. त्यासाठी फक्त कागदावर असलेले हे अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष कार्यान्वित झालेच पाहिजेत..जादूटोणाविरोधी कायद्याचे नियमडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बलिदानानंतर २०१३ मध्ये जादूटोणाविरोधी कायदा मंजूर झाला. याला एक तप उलटून गेले तरीही शासनाने या कायद्याचे नियम तयार केलेले नाहीत. जादूटोणाविरोधी कायद्याचे नियम तयार करून या कायद्याच्या अंमलबजावणीची प्रक्रिया आणि त्यासंदर्भातील पोलिसांची जबाबदारी शासनाने अधिक सुस्पष्ट केली पाहिजे..Social Issues : विवाह न जमणे : एक सामाजिक समस्या.लोकांच्या मनात भीती उत्पन्न करून त्यांना अघोरी कृत्ये करायला लावणारे अशोक खरात सारखे ज्योतिषी, बाबा, बुवा, मांत्रिक गावोगावी आहेत. ते अशोक खरात एवढे दांडगे बनण्याची वाट न पाहता वेळीच पोलिस हस्तक्षेप करून त्यांच्या प्रभावाला पायबंद घालण्यासाठी या कायद्याचे नियम तयार झालेच पाहिजेत. सदर नियमांचा प्रस्तावित मसुदा महाराष्ट्र अंनिसने याआधी शासनाला सादर केलेला होता. परंतु लवकरच पुन्हा एकदा अंनिसच्या वतीने या नियमांचा मसुदा सामाजिक न्याय विभागाला सादर करण्यात येणार आहे..अंधश्रद्धा प्रसाराला अटकावसोशल मीडियातून बाबा- बुवा, ज्योतिषी, मंत्र-तंत्र यांच्या रील्सचा लोकांवर अक्षरशः भडिमार होत आहे. औरंगाबाद खंडपीठाच्या या संदर्भातील निर्णयाला अनुसरून शासनाने अंधश्रद्धा पसरवणाऱ्या जाहिरातींचे नियमन करणारी स्वतंत्र यंत्रणा तातडीने तयार करायला हवी. सर्वोच्च न्यायालयाने देखील या विषयी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत असलेले दक्षता अधिकारी अशा प्रकारे सोशल मीडिया मधून भोंदूगिरीच्या जाहिराती पसरवणाऱ्या व्यक्तींच्या वर प्रतिबंधात्मक कारवाई करू शकतात..Farmer Issues: कापूस नाकारल्याने शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न.भोंदूबाबा, ज्योतिषी यांनी शोषण केलेल्या पीडित व्यक्तींसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती एक हेल्पलाइन सुरू करीत आहे. या हेल्पलाइनचे मोबाईल क्रमांक ७५८८८०६६८८, ८०८७८७६८०९ असे आहेत. ज्योतिषी, भोंदूबाबा महिलांचे शोषण करीत असल्यास हेल्पलाइन क्रमांक ९५२२३०५९२९ यावर संपर्क करावा. याद्वारे प्राप्त झालेल्या तक्रारींचे तथ्य तपासून अंनिस वेळोवेळी त्यांची यादी पोलिसांना देणार आहे..शालेय वयाच्या पासून मुलांच्या वर भोंदूगिरीचे दावे करणारी व्यक्ती कशी ओळखायची याचे वैज्ञानिक दृष्टिकोन प्रशिक्षण सुरु करणे आवश्यक आहे. जादूटोणा विरोधी कायद्यानुसार दैवी चमत्काराचा दावा करणे आणि त्याद्वारे लोकांना फसवणे हा गुन्हा आहे हे लहान वयापासूनच मुलांना सांगितले जाणे आवश्यक आहे अनेक वेळा शाळेमधले शिक्षकच अंधश्रद्धेला बळी पडलेले असतात..त्यामुळे मुलांच्या मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी सुरुवात शिक्षणांच्या भोंदुगिरी विषयी प्रशिक्षणे घेऊन करायला पाहिजे. राजकारणी आणि प्रशासन यांची आणि भोंदू बाबा बुवांचे एक मोठे हितसंबंधांचे जाळे तयार झाले आहे. ते कसे तोडायचे हा खरेच कळीचा प्रश्न आहे. त्यासाठी या खरात प्रकरणात सहभागी असलेल्या राजकारणी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यावर कठोर करवाई होणे आवश्यक आहे. भोंदू बाबांच्या आहारी गेलेले लोक प्रतिनिधी निवडताना आपण विचार करणे आवश्यक आहे..माध्यमांची भूमिकाअनेक वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक मीडियादेखील भोंदूगिरीला बढावा देणाऱ्या जाहिराती दाखवत असतात. माध्यमांनी आपली सामाजिक जबाबदारी म्हणून अशा प्रकारच्या लोकांना फसवणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करणे थांबले पाहिजे. अशोक खरात सारख्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात महिलांचे शोषण झाल्याचे दिसून येते. अनेक वेळा हे शोषण लैंगिक स्वरूपाचे असते. आपल्या समाजातील पुरुष प्रधान संस्कृतीचा त्याला एक मोठा संदर्भ आहे. त्यामुळे स्त्री-पुरुष समता या विषयी सातत्याने प्रयत्नशील राहणे हे देखील महिलांमधील अंधश्रद्धा निर्मूलनांचे एक महत्त्वाचे अंग समजले पाहिजे. या प्रकरणात शोषित महिलांना समुपदेशानाच्या पासून ते पुनर्वसनापर्यंत सर्व सुविधा शासनाने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे..कुठल्याही बाबा अथवा बुवाने काहीही दावा केला तरी त्याच्याकडे जायचे का नाही, हा निर्णय शेवटी प्रत्येकाने व्यक्ती म्हणून घ्यायचा असतो. आपली फसवणूक होऊ नये अशी अपेक्षा असेल तर आपण देखील चिकित्सक मनोभावाची जोपासना करणे अत्यंत आवश्यक आहे. साधे किराणा समान घेताना आपण किती चिकित्सा करतो, तशाच प्रकारची चिकित्सा ही कुठल्याही बाबा किंवा बुवाकडे जाण्याच्या आधी करणे आवश्यक आहे.hamid.dabholkar@gmail.com(लेखक ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’चे (अंनिस) कार्यकर्ते आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.