Pune News: ‘‘अन्नापासून ते घराच्या छपरापर्यंत उपयुक्त ठरणारा नारळ हा कल्पवृक्ष आहे. मौल्यवान नारळ टिकले तरच गोव्याची संस्कृती टिकेल. त्यामुळे राष्ट्रीय नारळ परिषदेच्या माध्यमातून तमिळनाडूसह इतर राज्यांतून मिळणाऱ्या उत्तम लागवड पद्धतीच्या प्रसारासाठी शासन कटिबद्ध राहील,’’ अशी ग्वाही गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. .दैनिक ‘गोमन्तक’, गोवा शासन व दैनिक ‘ॲग्रोवन’ यांच्या वतीने शुक्रवारी (ता. १०) पणजी येथील ‘इंटरनॅशनल सेंटर, गोवा’ येथे आयोजित ‘राष्ट्रीय नारळ परिषदे’चे उद्घाटन करताना डॉ. सावंत बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून गोव्याचे कृषिमंत्री रवी नाईक, तमिळनाडूचे कृषिमंत्री एम. आर. के. पनीरसेल्वम्, केंद्रीय किनारपट्टी कृषी संशोधन संस्थेचे (सीसीएआरआय) संचालक डॉ. परवीन कुमार, ‘सकाळ माध्यम समूहा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, ‘गोमन्तक’चे संपादक संचालक राजू नायक, ‘अग्रोवन’चे निवासी संपादक रमेश जाधव व्यासपीठावर होते..National Coconut Conclave: नारळ - काजूची लागवड वाढवा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, 'ॲग्रोवन’च्या दिवाळी अंकाचे गोव्यात प्रकाशन.प्रक्रियेला चालना देणारया वेळी श्री. नाईक म्हणाले, “नारळ, काजू, सुपारीच्या बागा आमच्या पूर्वजांनी दिलेली अमूल्य देणगी आहे. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सोबत करणाऱ्या नारळाने तर आमची संस्कृती व्यापून टाकली आहे. मात्र सध्या नारळ उत्पादनात अनेक समस्या उद्भवत आहेत. त्यावर मात करण्यासाठी गोवा सरकार विविध उपक्रम राबवीत आहे. यापुढे काजूसह आंबा, नारळ प्रक्रियेला चालना देण्यासाठी सरकार प्रयत्न करेल.”.सर्वोत्तम कृषी राज्याकडे वाटचालश्री. पनीरसेल्वम् यांनी तमिळनाडूमधील कृषी क्षेत्राच्या बळकटीकरणाबाबत सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. “आमच्या राज्यात शेतकरी आत्महत्या घडत होत्या. परंतु स्टॅलिन सरकारने शेतीसाठी अर्थसंकल्पात ४५ हजार कोटींची तरतूद केली. मोफत वीज, योग्य पीकविमा, शेतकरी बाजारांचा विस्तार केला. आम्ही भात, पौष्टिक तृष्णधान्ये, काजू, नारळाला प्रोत्साहन दिले. त्यामुळे आता शेतकरी समृद्ध होत असून, देशातील सर्वोत्तम कृषी राज्याकडे आमची वाटचाल चालू झाली आहे,” असे त्यांनी सांगितले..National Coconut Conclave: नारळ - काजूची लागवड वाढवा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, 'ॲग्रोवन’च्या दिवाळी अंकाचे गोव्यात प्रकाशन.नारळासमोर चार मोठे अडथळेप्रास्ताविकात श्री. नायक म्हणाले, “गोवा राज्य छोटे असले तरी येथील माड आणि माणसे उत्तुंग आहेत. कीड, माकडांचा उपद्रव, मजूरटंचाई आणि हवामान बदल असे चार मोठे अडथळे नारळ बागायतीसमोर आहेत. त्यामुळे या समस्यांचा वेध घेत अधिक तंत्रशुद्ध लागवड पद्धती शेतकऱ्यांपर्यंत नेण्याचा निर्धार ‘गोमन्तक’ने केला आहे. त्यासाठीच ही सर्वंकष परिषद घेतली जात आहे.” महाराष्ट्र व गोव्यातील निवडक शेतकऱ्यांसह शास्त्रज्ञ, अभ्यासक, व्यापारी तसेच उद्योजकांनी या परिषदेत सहभाग नोंदविला. परिषदेच्या निमित्ताने भरविलेल्या नारळ उत्पादन ते प्रक्रियेपर्यंत माहिती देणाऱ्या प्रदर्शनालाही उत्तम प्रतिसाद लाभला. परिषदेत दिवसभरात तीन चर्चासत्रांमध्ये नारळ बागायतीशी संबंधित मुद्द्यांवर विविधांगी चर्चा झाली. विशेष म्हणजे तमिळनाडू शासनाने या परिषदेसाठी चार सनदी अधिकाऱ्यांना पाठवले होते. परिषदेच्या चर्चासत्राचे सूत्रसंचालन ‘ॲग्रोवन’चे मुख्य उपवृत्तसंपादक अमित गद्रे यांनी केले. उदय जाधव यांनी आभार मानले..सिंचन, अन्नद्रव्याकडे झाले दुर्लक्षनारळ बागायतीमध्ये सिंचन व अन्नद्रव्याकडे दुर्लक्ष झाल्याचे निरीक्षण डॉ. कुमार यांनी नोंदविले. ते म्हणाले, “इतर राज्यांच्या तुलनेत गोव्याची नारळाची घटती उत्पादकता चिंतेची बाब आहे. त्यामुळे उत्पादकता वाढीसाठी शास्त्रज्ञांचे सतत संशोधन चालू आहे. यातून नव्याने पुढे येणाऱ्या लागवड पद्धती शेतकऱ्यांना दिलासादायक ठरतील.”.गोवा म्हणजे नारळाचे झाडमुख्यमंत्री श्री. सावंत यांनी गोव्याच्या संस्कृतीशी नारळाचे घट्ट बंध कसे आहेत, हे स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘गोवा म्हणजेच नारळाचे झाड ही ओळख तयार झाली आहे, इतके महत्त्व नारळाचे आमच्या संस्कृतीत आहे. आमचे साहित्य, समाज, अर्थकारण आणि पर्यटनात नारळच अग्रभागी आहे. त्यामुळे राष्ट्रीय नारळ परिषदेचे आयोजन केल्याबद्दल मी ‘सकाळ माध्यम समूहा’चे अभिनंदन करतो. या उपक्रमामुळे शेतकरी-शास्त्रज्ञ मंथन होईल व त्यातून निघणाऱ्या उत्तम लागवड पद्धती व तंत्रांचा प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत प्रसार करण्यासाठी सरकार म्हणून आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू.”.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.