Global Agri Festival : नारायणगाव केव्हीकेत ९ पासून ‘ग्लोबल कृषी महोत्सव’
Pune News : नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने ग्लोबल कृषी महोत्सवाचे आयोजन ९ ते १२ जानेवारी २०२५ या कालावधीत करण्यात आले आहे. यामध्ये पीक प्रात्यक्षिके आणि परिसंवाद आधारित कृषी प्रदर्शन नारायणगाव कृषी विज्ञान केंद्र येथे पाहता येणार आहे, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राच्या सूत्रांनी दिली.
ग्लोबल कृषी महोत्सवात एआय आणि आयओटी तंत्रज्ञान प्रात्यक्षिके, ८५ जातींसह २७ पिकांची प्रात्यक्षिके, २५० आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग असणार आहे. यामध्ये क्लायमेट स्मार्ट तंत्रज्ञान, मुक्त गोठा, अझोला, मूरघास, चारापिके व्यवस्थापन, नैसर्गिक शेतीचे दालन व पीक प्रात्यक्षिके आहेत.
तसेच शेती पूरक व्यवसाय प्रात्यक्षिकामध्ये देशी गोवंश आधारित शेती व पंचगव्य निर्मिती (साबण, धूप, दंतमंजन, जिवामृत, दशपर्णी, गांडूळ खत निर्मिती इ.), कोंबडीपालन (१० विविध जातींच्या कोंबड्या), शेळीपालन, मधमाशीपालन, मशरूम उत्पादन, ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक,
शेतीपूरक लघुउद्योग मार्गदर्शन, अवजारे व यंत्राची प्रात्यक्षिके, स्वयंचलित सिंचन प्रणाली उपलब्ध असणार आहे. याशिवाय पोषणबागमध्ये एका गुंठ्यांत ३२ पिके, परसबागेचे विविध मॉडेल, जैवसंपृक्त वाण,
मिलेट गार्डन, तुर्की बाजरी, मायक्रो ग्रीन्स, महिला बचत गट धान्य व फळे महोत्सवामध्ये गृह उपयोगी, शेती निगडित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री, स्वादिष्ट खाद्य पदार्थांचा अनुभव घेता येणार आहे. प्रदर्शनात मोफत प्रवेश आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.