Minister Dr. Vijayakumar Gavit : शेतकऱ्यांना पेरणीसाठी योग्य मार्गदर्शन करा

Kharif Season Update : यंदाच्या खरीप हंगामात बियाण्यांची गुणवत्ता व पेरणीयोग्य कालावधी समजावून सांगण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे निर्देश आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिले आहेत.
Minister Vijayakumar Gavit
Minister Vijayakumar GavitAgrowon
Published on
Updated on

Nandurbar Kharif Season News : यंदाच्या खरीप हंगामात बियाण्यांची गुणवत्ता व पेरणीयोग्य कालावधी समजावून सांगण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे निर्देश आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित (Minister Dr. Vijayakumar Gavit ) यांनी दिले आहेत.

खरीप हंगामपूर्व आढावा बैठक नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात झाली. यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, उपाध्यक्ष सुहास नाईक, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राकेश वाणी तसेच ‘कृषी’सह विविध यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Minister Vijayakumar Gavit
Minister Dr. Vijayakumar Gavit : शेतीला चोवीस तास विजेसाठी प्रयत्नशील

पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, की बँकांनी लक्ष्यांकाप्रमाणे कर्ज वितरण करणे अपेक्षित आहे. डॉ. गावित यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेत ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा घेतला आहे, अशा शेतकऱ्यांना पिकांच्या कापणी प्रयोगाच्या आधारावर मिळणारी पीकविम्याची रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

अवकाळी पावसामुळे व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून सुमारे आठ कोटी ५६ लाख ८७ हजार इतका निधी शासनाकडून मंजूर झाला असून, तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तत्काळ वितरित करण्याच्या सूचनाही या वेळी डॉ. गावित यांनी केल्या आहेत.

या विषयांचा घेतला आढावा

बैठकीत खतपुरवठा, कीटकनाशके व अवजारे, गुणवत्ता नियंत्रण, कृषी विभागामार्फत राबविण्यात आलेल्या महत्त्वाच्या योजना, प्रधानमंत्री पीकविमा योजना, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, मूलस्थानी जलसंधारण, बीजप्रक्रिया, मिश्रपीक पद्धती व इतर तंत्रज्ञान, संभाव्य पर्जन्यमानासंदर्भात करावयाच्या उपाययोजना, कृषी पतपुरवठा, कृषिपंपांसाठी वीजजोडणी व डिझेल नियोजन पाणीवापर संस्थांची सद्यःस्थिती या विषयांचा आढावा घेण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com