Village Development: महसुली गावांना स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा द्या

Grampanchayat Status: ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासासाठी महसुली गावांना स्वतंत्र ग्रामपंचायतींचा दर्जा देण्याची गरज असल्याचे अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. ग्रुप ग्रामपंचायतीमुळे अनेक वाड्यावस्त्या आणि गावांचा समतोल विकास खुंटल्याने या व्यवस्था रद्द करण्याची मागणी जोर धरत आहे.
Grampanchayat
GrampanchayatAgrowon
Published on
Updated on

Pune News: ग्रामीण महाराष्ट्राच्या आणि गाव खेड्यांच्या विकासासाठी ग्रामपंचायत ही महत्त्वाची संस्था आहे. परंतु आजही अनेक ग्रामपंचायती या ग्रुप ग्रामपंचायती असल्याने गावाच्या विकास खुंटला आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करताना गाव, खेड्याच्या विकासाठी ग्रुप ग्रामपंचायत बरखास्त करून महसुली गावांच्या स्वतंत्र ग्रामपंचायती करण्याची भूमिका अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास नुकतेच आणून दिले आहे.

स्वातंत्र्यानंतर राज्यात आजही अनेक ग्रामपंचायती ग्रुप ग्रामपंचायती असल्याने गावांचा समतोल विकास होत नाही. काही वाड्यावस्त्या विकासापासून वंचित राहत आहेत. काही ग्रामस्थांना ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये येण्यासाठी अनेक किलोमीटर प्रवास करायला लागतो. एकाच भागात विकास केंद्रित होतो, ठरावीक भागातील सरपंच व सदस्य सातत्याने निवडून येतात अशा अनेक तक्रारी आहेत.

Grampanchayat
Grampanchayat Budget : ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प आणि लेखे

शहरात मिळणाऱ्या सोईसुविधा गाव खेड्यांमध्ये मिळण्यासाठी या ग्रुप ग्रामपंचायती बरखास्त करून महसुली गावांना स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा देऊन त्यांची स्थापना करणे अत्यावश्यक आहे. युती शासन नेहमीच सरपंच आणि ग्रामपंचायत यांच्या बाबतीत सकारात्मक राहिले आहे. त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्रातील काही वाड्यावस्त्या या विकासापासून वंचित राहू नयेत.

तसेच इतर गावांच्या बरोबरीने त्यांना सुद्धा विकासाची लागलेली आस पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र ग्रामपंचायतीची गरज आहे. सध्याच्या काळात उच्चशिक्षित तरुण ग्रामपंचायतीमध्ये सदस्य व सरपंच म्हणून निवडून येत आहेत. त्यामुळे गावखेडी वेगाने विकासाकडे झेप घेत आहेत. अशा होतकरू तरुणांकडे ग्रुप ग्रामपंचायती बरखास्त करून नवीन केलेल्या ग्रामपंचायती हाती आल्यास ते विकासाचा अनुशेष निश्‍चितपणे भरून काढतील.

Grampanchayat
Grampanchayat Award : पुरस्कार हे गावाचे वैभव

नगरपालिका तसेच महानगरपालिका यांना स्वतःची उत्पन्नाची प्रचंड साधने असताना नगर विकास विभागामार्फत त्यांना मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. त्याचबरोबर शहरांच्या विकासासाठी सिडको, एमएमआरडीएस, पीएमआरडीए, हुडको, प्राधिकरण अशा कंपन्या स्थापून अब्जावधी रुपयांची तरतूद व निधी उपलब्ध केला जातो. त्यामुळे देशांमध्ये शहर म्हणजे इंडिया आणि गाव खेडी म्हणजे भारत असे दोन देश निर्माण होत आहेत.

ग्रुप ग्रामपंचायती रद्द करण्याची कारणे :

- राज्यातील एकूण गावांची संख्या ४० हजार ९५९ एवढी आहे.

- महसुली गावांची संख्या ३६ हजार ५३७ एवढी आहे.

- ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ९५१ एवढी आहे.

- एकूण गावांपेक्षा १३ हजार ८ एवढ्या ग्रामपंचायती कमी आहेत.

- महसुली गावांपेक्षा ८ हजार ५८६ एवढ्या ग्रामपंचायती कमी आहेत, हा फारच मोठा विरोधाभास आहे.

- नवीन ग्रामपंचायतींसाठी लोकसंख्येचा निकष सुद्धा शिथिल करावा.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना ग्रामीण महाराष्ट्र आणि गाव खेड्यांच्या विकासासाठी ग्रुप ग्रामपंचायती बरखास्त करण्याची वेळ आलेली आहे. महसुली गावांना स्वतंत्र ग्रामपंचायत करण्याबाबत आमच्या भावना अत्यंत तीव्र आहेत. शासनाने योग्य भूमिका न घेतल्यास तीव्र आंदोलन उभे केले जाईल.
जयंत पाटील, अध्यक्ष, अखिल भारतीय सरपंच परिषद

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com