
Jalgaon News : खानदेशात सर्वात मोठ्या गिरणा धरणातील जलपातळी यंदा १०० टक्के होती. याचा लाभ गिरणा पट्ट्यास झाला असून, रब्बी जोमात आहे. गहू, हरभरा, ज्वारी आदी पिके हाती येत आहेत. रब्बीची पेरणी गिरणा पट्ट्यात १०० टक्क्यांवर झाली होती. यंदा गिरणा धरणातून रब्बीसाठी पाणी मिळत आहे. दुसरीकडे अन्य मध्यम, लघु प्रकल्पदेखील भरले आहेत.
यामुळे रब्बी गिरणा पट्ट्यात जोमात येत आहे. गिरणा नदीवरील गिरणा धरण खानदेशातील सर्वात मोठे धरण आहे. गिरणा धरण भौगोलिकदृष्ट्या नाशिकमधील नांदगावात आहे. परंतु त्याचा सर्वाधिक लाभ जळगावातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, धरणगाव आदी भागास आहे.
नाशिकमधील मालेगाव शहर, नांदगाव शहर आणि मालेगावातील उद्योगांना या धरणातून पाणी दिले जाते. तसेच जळगावातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव शहरांसह १२० गावांच्या पाणी योजना गिरणा धरणावर अवलंबून आहेत. या धरणाची साठवण क्षमता १८ टीएमसी आहे. कमी पावसामुळे मागील वेळेस हे धरण फक्त ५६ टक्के भरले होते.
धरणात पुरेसा जलसाठा मागील वेळेस नसल्याने त्यातून रब्बीस पाणी मिळाले नव्हते. परंतु यंदा गिरणा धरण १०० टक्के भरले होते. गिरणा पट्ट्यातील २१ हजार हेक्टरवर रब्बी हंगामास लाभ मिळाला आहे. या धरणातून दोन वेळेस नदीत आवर्तन सोडण्यात आले आहे.
या धरणात जलसाठा मुबलक असल्याने पाणी योजनांनादेखील पाणी पुरेसे मिळत आहे. यंदा खरिपात मोठी हानी विविध पिकांची झाली होती. यामुळे शेतकऱ्यांना रब्बीबाबत अपेक्षा होत्या. आता रब्बी हाती आल्याची स्थिती आहे.
गिरणा पट्ट्यात चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, धरणगाव, जळगाव आदी क्षेत्र आहे. या भागातील लहान-मोठे तलाव, मध्यम प्रकल्पही भरले होते. चाळीसगावातील मन्याड, पाचोऱ्यातील, अग्नावती, बहुळा, पारोळ्यातील भोकरबारी, बोरी, एरंडोलातील अंजनी आदी प्रकल्पांत जलसाठा मुबलक आहे. मन्याड प्रकल्प मागील वेळेस कोरडाठाक होता.
तसेच पारोळ्यातील भोकरबारी, बोरी, म्हसवे लघु प्रकल्पातही जलसाठा कमी होता. बोरी प्रकल्पात बऱ्यापैकी जलसाठा असल्याने पारोळ्यातील मोठ्या क्षेत्रास लाभ होत आहे. पाण्याचा वापर यंदाही अधिक आहे. तामसवाडी, भोकरबारी व म्हसवे प्रकल्पात पाणी असल्याने जलसंकट दूर झाले आहे. सावखेडा येथील इंदासी प्रकल्पदेखील भरला. तामसवाडी प्रकल्पातून तामसवाडी, बोळे, शेवगे, टोळी, पिंप्री, मुंदाणे, हिवरखेडा आदी गावांना पिण्याचे पाणी मिळत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.