
Ratnagiri News : कोकण हापूस नावाने अन्य आंब्यांची होणारी विक्री रोखण्यासाठी, कोकण हापूसच्या नावावर ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी कोकण हापूसला भौगोलिक निर्देशांक (जीआय मानांकन) देण्यात आले आहे.
‘हापूस’च्या नावावर होणाऱ्या विक्रीला बागायतदारांकडून विरोध होत आहे; मात्र ही नोंदणी करण्यासाठी ‘जीआय’ देणाऱ्या संस्थांना बागायतदारांचे मेळावे घ्यावे लागत आहेत. आतापर्यंत पाच जिल्ह्यांतील १ हजार ८३९ बागायतदारांनी ‘जीआय’ नोंदणी केली असून, राज्यात पहिला क्रमांक आहे.
रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील हापूसला ३ वर्षांपूर्वी ‘जीआय’ मानांकन मिळाले आहे. देवगडचा हापूस आंबा ‘देवगड हापूस’ तर रत्नागिरीचा हापूस ‘रत्नागिरी हापूस’ नावाने ओळखला जात आहे. रत्नागिरी व देवगड हापूस आंब्याला जीआय मानांकन मिळाल्याने या आंब्याच्या नावाखाली कर्नाटक हापूस आंबा विकता येणार नाही.
मात्र, त्यासाठी बागायतदारांना जीआय मानांकनासाठी अधिकृत नोंदणी करणे गरजेचे आहे. ही नोंदणी केल्यानंतर बागायतदारांना जीआय टॅग लावून आंबा विक्रीसाठी पाठवता येतो. फळाबरोबर लावलेला बारकोड स्कॅन केल्यानंतर मोबाइलमध्ये फळाचे उत्पादक व प्रक्रिया उद्योगाची माहिती मिळणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर आंबा लागवड असून, जिल्ह्यात २० हजार बागायतदार आहेत. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३१ हजार २५० हेक्टर क्षेत्र असून, ३४ हजार ४५० बागायतदार आहेत; मात्र, जीआय नोंदणीसाठी अत्यल्प प्रतिसाद लाभत आहे.
कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादन विक्रेते सहकारी संस्था, केळशी परिसर आंबा उत्पादक संघ, देवगड आंबा उत्पादक संघ हे जीआय मानांकन नोंदणीसाठी बागायतदारांकडे पाठपुरावा करत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात ९०० बागायतदार, १४० प्रक्रिया व्यावसायिक तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ७९९ बागायतदारांनी नोंदणी केली आहे.
आवश्यक कागदपत्रे
‘जीआय’ मानांकनासाठी आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, सात-बारा याशिवाय २६०० शुल्क भरावे लागते. या शुल्कामध्ये दहा वर्षे नियंत्रण ठेवणे, आंब्याचा दर्जा पाहणे ही जबाबदारी संस्थेकडे सुपूर्द करण्यात आली आहे. नोंदणीनंतरच नोंदणीकृत व्यक्तींना हापूसचा टॅग किंवा बारकोड वापरता येतो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.