Pomegranate Orchard Fire : घोसपुरी येथे शॉर्टसर्किटमुळे पाच एकर डाळिंबाची बाग जळाली
Nagar Fire News : ट्रान्स्फॉर्मरमधील झालेल्या शॉर्टसर्किटमुळे घोसपुरी (ता. नगर) येथील बाबासाहेब नानाभाऊ झरेकर यांची पाच एकर डाळिंब बाग (Pomegranate Orchard) व त्यातील ठिबक सिंचनासह (Thibak Shinchan) अन्य साहित्य जळून खाक झाले आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.
महावितरणकडून मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप संबंधित शेतकऱ्याने केला आहे. नुकसानीचा पंचनामा करून महावितरणने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी संबंधित शेतकऱ्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
भोजपुरी येथील शेतकरी बाबासाहेब नानाभाऊ दरेकर यांनी २०१९ मध्ये पाच एकर क्षेत्रावर डाळिंबाच्या १५०० झाडांची लागवड केली.
डाळिंब बाग ऐन भरात व उत्पादन देण्याच्या स्थितीत होती. घराजवळील असलेल्या ट्रान्स्फॉर्मरमधून नुकत्याच झालेल्या शॉर्टसर्किटमुळे डाळिंब बाग व त्यातील ठिबक सिंचनाचे सर्व साहित्य जळून खाक झाले आहे.
यामुळे झरेकर यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले याबाबत त्यांनी महावितरणला कळवले. महावितरणचे लोक बागेकडे येऊन पाहणी करून गेले. ही बागही शॉर्टसर्किटमुळे जळाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
मात्र त्यानंतर महावितरणकडून दुर्लक्ष केले जात आहे. झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून महावितरणने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी संबंधित शेतकऱ्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.