घर माझे शोधायाला

घर माझे शोधायला वाऱ्यावर वण वण केली, जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते,
मशागत लेख
मशागत लेखAgrowon
Published on
Updated on

जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते, भटसाहेबांच्या या शब्दांनुसार ज्या झाडाच्या सावलीत विसावावे त्यानेच उन्मळून पडावं, जिवावर उठावं, किंवा जे एकमेव आशेचे ठिकाण आहे, तेही नष्ट व्हावं, मग उरतो तो भणंगपणा आयुष्याला पुरावा. कुठून तरी पुन्हा ती साद येईल असे वाटत असतानाच सांजेचे पश्‍चिमरंग खुलू लागतात. दुपारच्या भगभगीत उन्हाची स्मरणे दाराशी सौम्य होऊन रेंगाळत राहतात. येणारी रात्र पोटात घेणार असते सगळ्या उरल्यासुरल्या इच्छा, स्वप्नांसह. हंबरओल्या आठवांसह. नात्यांचा बिलोरी आरसा, जो विखरून पडलेला असतो पायतळी, असंख्य तुकडे, त्यात आपलीच असंख्य प्रतिबिंबे, भेसूरपणे छद्मीपणे हसत राहतात आपल्यावरच. वेचायला जावं तर पुन्हा काचतात. काचांच्या तीक्ष्ण किनारी.

या अशा कडेलोटाच्या क्षणी सावरणारे हातही नकोसे वाटतात, जगण्याचं उसने अवसान गलितगात्र होतेच. ते मान टाकतेच कधीतरी. नि मग आहे तिथंच थांबून घ्यावंसं वाटतं. मिटू लागतात हृदयाच्या पाकळ्या, कुणाबद्दल राग नाही नि कुणासाठी लोभही नाही. स्थिर होतात मानस सरोवरातील लाटा, ती आंदोलनं, तो आक्रोश, अशी निर्विकार, निर्विकल्प समाधी वेदनेच्या काठावरच अनुभवता येते. सुखाच्या हिंदोळ्यावर हे स्थैर्य कुठे? ही अमर्याद अशांतता गोठवून टाकते सर्व जाणिवांना. श्‍वासानींही हिरमुसते जुईचे फूल. तेवढीही धग सहन होत नाही त्याला. नि मग एकदा सुकल्यावर त्याला उन्हाळा काय नि पावसाळा काय. मेलेले कोंबडे आगीला भीत नसते, शरीरातून प्राण गेला की ते चितेच्या ज्वाळांनी होरपळत नसते. शुद्ध हरपलेल्या जखमी माणसाला वेदना जाणवत नसतात. मग तीच अवस्था बरी वाटते, येणारी जाग पुन्हा तीच ठसठस घेऊन येणार. मग हवी कशाला ती जागृतावस्था. झोकून द्यावं स्वतःला ग्लानीच्या निबिड काळोखात. गाढ निद्रेच्या हवाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com