Burud Workers : आम्हाला बांबू मिळवून द्या

Demand for Workers : आमचे बांबूवरच जीवन आहे. त्यामुळे आम्हाला बांबू मिळवून द्यावा, अशी मागणी बुरड कामगारांची आहे.
Burud labor
Burud LaborAgrowon

Amravati News : बुरुड समाज व कामगारांची परिस्थिती हलाखीची आहे. सरकारने वेळोवेळी कायदे केले, परंतु ते कायदे पथ्यावर पडले. वनविभागाकडून कमी किमतीत बांबू मिळणे बंद झाले. अशा परिस्थितीत जीवन जगावे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. आमचे बांबूवरच जीवन आहे. त्यामुळे आम्हाला बांबू मिळवून द्यावा, अशी मागणी बुरड कामगारांची आहे.

प्लॅस्टिकच्या युगात बांबूपासून बनविलेल्या वस्तूंना फारशी मागणी नाही. मात्र बांबूच्या काही वस्तू गृहोपयोगी म्हणून आवश्यक ठरल्या आहेत. टोपल्या, सूप, डाले आदी वस्तू प्लॅस्टिकच्या बनविल्या जात नाहीत. उलट त्या वस्तू बांबूपासून बनविल्याने महत्त्वपूर्ण ठरतात. बुरड व्यावसायिकांना वेळेवर व चांगल्या प्रतीचा बांबू पुरविण्यात येत नसल्याने पारंपरिक व्यवसाय रसातळाला आला आहे.

Burud labor
Burud work business : बुरूड व्यवसायाच्या उत्पन्नातून मिळाला आधार

बुरुड समाज विविध वस्तूंची निर्मिती करून त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. परिसरात जंगलाचे प्रमाण अधिक आहे. परंतु तिथे जाण्यास बंदी आहे. वनविभागाकडून बुरुड कामगारांना नियमित बांबू पुरविला जात नाही. त्यामुळे मेळघाटात बुरुड कामगारांची होरपळ होऊ लागली आहे. बांबू मिळत नसल्याने हा समाज पारंपरिक कलेपासून दूर जाऊ लागला आहे.

Burud labor
MAIDC : ‘कृषी उद्योग विकास’मध्ये दिव्यांग कर्मचाऱ्याला त्रास

औद्योगिकीकरणामुळे विविध प्रकारच्या वस्तूंची कारखान्यात निर्मिती होते. त्यामुळे बुरुड कामगारांनी तयार केलेल्या वस्तूंसाठी बाजारपेठच उपलब्ध नाही, असे चित्र आहे. चिखलदरा तालुक्यातील चिचखेडा, बिहाली, घटांग, खोंगडा येथे बुरड कामगार असून ते सूप, टोपल्या, ताटी, पंखा, डाले व गृहोपयोगी शोभेच्या वस्तू तयार करतात.

वनविभागाच्या उदासीन धोरणामुळे संकट

वनविभागाच्या उदासीन धोरणामुळे व बांबूच्या तुटवड्यामुळे कामगारांना शेतकऱ्यांकडून खासगी स्वरूपात बांबू खरेदी करावे लागतात. त्यांना बांबू डेपोतून बांबू मिळणे बंदच झाले. वाळलेला बांबू खरेदी केला तर त्याला ओला करण्यासाठी नदीत पाणी नसते. त्यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागते. बांबूपासून तयार केलेले सूप, डाले व टोपली आदी साहित्याची विक्रीसाठी गावोगावी भटकंती करावी लागते. साहित्याची विक्री झाली न झाल्यास दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत होत असल्याची स्थिती आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com