Agriculture Extension : कृषी विस्तारात शेतकऱ्यांची मदत घ्या

आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त कृषी विज्ञान केंद्र येथे तृणधान्याच्या सेल्फी बोर्डचे उद्घाटन करण्यात आले.
Indian Agricultural
Indian AgriculturalAgrowon

Beed News : ‘‘कृषी विस्ताराच्या (Agriculture Extention) कामात प्रगतिशील, प्रयोगशील शेतकऱ्यांची मदत घ्या. त्यांना विद्यापीठाच्या कृषी ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाचे (Technology) दूत बनवा,’’ अशी सूचना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे (VNMKV) कुलगुरू डॉ. इंद्र मणी (Dr. Indra Mani) यांनी केली.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र खामगावच्या वैज्ञानिक सल्लागार समितीची आठवी बैठक बुधवारी (ता. १) झाली. वैज्ञानिक सल्लागार समितीचे सदस्य, संलग्न विभागाचे अधिकारी, शेतकरी व शेतकरी महिला उपस्थित होत्या.

Indian Agricultural
Dr. Panjabrao Deshmukh : पंजाबराव देशमुखांच्या गावात होणार कृषी महाविद्यालय

आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष २०२३ (Millet Year) निमित्त कृषी विज्ञान केंद्र येथे तृणधान्याच्या सेल्फी बोर्डचे उद्घाटन करण्यात आले. तसेच केंद्रातर्फे तयार करण्यात आलेले पौष्टिक तृणधान्य (Nutritious Millet) विषयीच्या पोस्टरचे विमोचन करण्यात आले.

केंद्राचे कार्यक्रम समन्वयक प्रा. दीप्ती पाटगावकर यांनी ‘केव्हीके’चे २०२२ या वर्षीच्या केलेल्या कार्याचे सादरीकरण केले. त्याचबरोबर विविध शास्त्रज्ञांनी मागील वर्षातील कार्याचा आढावा सादर केला. त्यानंतर सदस्यांनी केलेल्या कामाची प्रशंसा करून पुढील वर्षी करण्यात येणाऱ्या कामाबद्दल सल्ला दिला.

डॉ. इंद्रमणी यांनी केव्हीकेने प्रक्षेत्रावर राबविलेल्या वेगवेगळ्या तृणधान्यांचे पीक संग्रहालय (विविध मिलेट्स ) यांची पाहणी करून केव्हीकेतील पीक संरक्षण कीटकशास्त्र या विभागामार्फत नव्याने चालू केलेल्या रेशीम किटक संगोपन युनिटचे उद्घाटन केले. त्याचबरोबर केंद्राच्या प्रक्षेत्रावरील शेळीपालन युनिट, आदर्श पोषण बागेस भेट देऊन पाहणी केली.

Indian Agricultural
Cashew Crop Management : शेतकरी नियोजन पीक : काजू

‘कडधान्यांचा विस्तार करा’

‘वनामकृवी’ परभणीचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर म्हणाले, ‘‘सोयाबीन अधिक तूर, कापूस अधिक तूर, तसेच तेल बियाणे, कडधान्यांचा विस्तार बीड जिल्ह्यात करावा.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com