Latur / Dharashiv News : दोन्ही जिल्ह्यांत गुरुवारी (ता. १३) व रविवारी (ता. १७) मुसळधार पावसाने हजेरी लावली. अनेक भागांत अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी दोन्ही जिल्ह्यात वेगवेगळी पद्धत अवलंबण्यात येत आहे. .धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांनाच नुकसान झालेल्या पिकांमध्ये उभारून जिओ टॅगिंगच्या साह्याने फोटो व भरपाई मागणीचा अर्ज भरून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर लातूर जिल्ह्यात महसूल व कृषी विभागाकडून प्रत्यक्ष भरपाईच्या ठिकाणी जाऊन नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. धाराशिव जिल्ह्यात पंचनाम्याचा पुरता गोंधळ उडाला असून जिओ टॅगिंग तंत्रज्ञानाची माहिती असलेल्या तंत्रस्नेही शेतकऱ्यांचे गावागावांमध्ये महत्त्व वाढले आहे..धाराशिव जिल्ह्यात गुरुवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे पिके पाण्याखाली आली. सखल भागात पाणी साचले. नद्यांना पूर आल्यामुळे नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी घुसले. ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने फुलोऱ्यात आलेल्या पिकांचे नुकसान झाले. प्रशासनाकडून पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम हाती घेण्यात आले असून, शेतात पाणी साचल्याने पंचनामे करण्यासाठी अडचणी येत आहेत. या स्थितीत पंचनामे करण्यासाठी कर्मचारी येईपर्यंत पिकांतील पाणी ओसरुन नुकसान झाल्याचे दाखवणे शेतकऱ्यांना शक्य होणार नाही. .Wildlife Crop Damage Compensation: वन्यप्राण्यांमुळे पीक नुकसानीची भरपाई कशी मिळते?.यामुळे प्रशासनाने शेतकऱ्यांनाच जिओ टॅगिंगच्या साह्याने पिकांचे नुकसानीचे फोटो काढून भरपाई मागणीचा अर्ज भरून देण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी विहित नमुन्यात अर्जही उपलब्ध करुन दिला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या स्थितीत अनेक शेतकऱ्यांना जिओ टॅगिंगचे फोटो काढणे जमत नसल्याने त्यांची अडचण झाली आहे. असे फोटो काढणाऱ्या शेतकऱ्यांचे महत्त्व वाढले असून त्यांच्यामागे शेतकरी धावताना दिसत आहे. .काही उतावीळ शेतकऱ्यांनी या फोटोच्या प्रिंट काढून तातडीने भरपाईचे अर्ज दाखल केले आहेत. भरपाईपासून वंचित राहू नये म्हणून शेतकऱ्यांची धावपळ सुरू असून, दुसरीकडे प्रशासनाची भरपाईच्या विहित प्रक्रियेबाबत भूमिका सातत्याने बदलत आहे. जीओ टॅगिंगमुळे भरपाईच्या प्रक्रियेत पारदर्शकता येत असल्याचा दावा जिल्हा प्रशासन करत आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना त्यांच्या भरपाईचे पंचनामे करण्याची सक्ती न करता सरसकट भरपाई द्यावी, अशी मागणी आमदार कैलास पाटील, माजी आमदार राहुल मोटे व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी केली आहे..Crop Damage Compensation : पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्या .लातूरमध्ये प्रशासनाकडूनच पंचनामेलातूर जिल्ह्यात पिकांमधील पाणी अजून ओसरले नसले तरी प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहे. पावसामुळे दलदल झाल्याने नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. जिल्ह्यात गाव पातळीवरील तलाठी व कृषी सहायकांकडून पंचनामे करण्यात येत आहे. .शेतकऱ्यांना स्वतः जिओ टॅगिंग करून फोटो काढण्याची किंवा भरपाई मागणीचा फॉर्म भरून देण्याची सक्ती केली जात नसल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवसांब लाडके यांनी दिली. दरम्यान, बोरगाव व धडकनाळ या गावच्या शिवारात महापुरामुळे दलदल झाल्याने पंचनाम्यासाठी अडचणी येत असून, पंचनामे करताना जिओ टॅगिंग केली जात असल्याचेही श्री. लाडके यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.