Rural Entrepreneur: गाय आधारित ज्ञान, विज्ञान आणि उद्योजकता त्रिसूत्रीवर आधारलेल्या ‘गौ टेक २०२६’ प्रदर्शनास शुक्रवारपासून (ता. २०) पासून पुण्यात सुरुवात झाली. सिंचननगर येथील कृषी महाविद्यालय मैदानात आयोजित करण्यात आलेले हे प्रदर्शन सोमवारपर्यंत (ता. २३) सर्वांसाठी खुले राहणार आहे. दररोज सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत नागरिकांना प्रदर्शनाला भेट देता येईल..‘ग्लोबल कन्फेडरेशन ऑफ काऊ-बेस्ड इंडस्ट्रीज’च्या पुढाकारातून, महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि केंद्र सरकारच्या एमएसएमई मंत्रालयाच्या सहकार्याने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘गौ आधारित ब्राऊन रिव्होल्यूशन’ला चालना देत ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले..Science Exhibition: जीएमआरटी केंद्रात उद्यापासून विज्ञान प्रदर्शन.आयोजकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या चारदिवसीय प्रदर्शनात २०० हून अधिक स्टॉल्स उभारण्यात आले असून, विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, उद्योजक, शेतकरी, संशोधक आणि स्टार्टअप्स यात सहभागी झाले आहेत. प्रदर्शनात जैव-खते, दुग्धजन्य व मूल्यवर्धित उत्पादने, गोबर व गोमूत्रावर आधारित नवोन्मेषशाली उत्पादने, नैसर्गिक शेती, बायोगॅस व अक्षय ऊर्जा, पशुखाद्य, कृषी यंत्रसामग्री, बँकिंग व वित्तीय सेवा यांसारख्या विविध घटकांचा समावेश आहे..Krushi Kumbh Exhibition: ‘कृषी कुंभ’ प्रदर्शनाचे आयोजन नेटके,मात्र शासकीय यंत्रणांची उदासीनता.याशिवाय, स्थानिक गाईंच्या विविध जातींचे प्रदर्शन, आयुर्वेद आणि पंचगव्य आधारित उपचार पद्धती, तसेच गोशाळा व्यवस्थापन आणि ग्रामीण विकासाशी संबंधित मॉडेल्सही पाहायला मिळणार आहेत. तसेच, ‘गौ परिक्रमा पथ’, आदर्श गोशाळा युनिट आणि वैदिक परंपरेतील गौ पूजन, यज्ञ यांसारखे उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत..बाराहून अधिक विषयांवर सत्रेप्रदर्शनादरम्यान १२ हून अधिक विषयांवर सेमिनार, शेतकरी संमेलन, महिला व युवकांसाठी विशेष सत्रे, तसेच स्टार्टअप नवोन्मेष मंच आयोजित करण्यात येणार आहेत. गोबर आणि गोमूत्रावर आधारित उत्पादने तयार करण्याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षणही येथे दिले जाणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.