Gardening Training : माळी प्रशिक्षण अभ्यासक्रम

Agriculture Training : माळी प्रशिक्षण अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना झाडांची छाटणी, आकार देणे हिरवळ लावणे, पिशव्या भरणे, छाटणी करणे, फुलझाडे, फळझाडे व्यवस्थापनाविषयी शिक्षण दिले जाते.
Gardening Training
Gardening TrainingAgrowon

Agriculture Business : शेती व्यवसायातील आमूलाग्र बदलांमुळे शेतकरी फलोत्पादन, फुलोत्पादन या क्षेत्राकडे वळत आहे. याचबरोबरीने शहरी भागात टेरेस गार्डन,परस शेती, भाजीपाला, फुलोत्पादनात रुची वाढत आहे. परसातील कमी जागेत औषधी वनस्पतींच्या लागवडीवर भर दिला जात आहे.या पार्श्‍वभूमीवर माळी प्रशिक्षण अभ्यासक्रम उपयुक्त ठरू शकतो.

माळी प्रशिक्षण अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना झाडांची छाटणी, आकार देणे हिरवळ लावणे, पिशव्या भरणे, छाटणी करणे, फुलझाडे, फळझाडे व्यवस्थापनाविषयी शिक्षण दिले जाते. उत्तीर्ण विद्यार्थी वेगवेगळ्या रोपवाटिका, कृषी विभाग, शासकीय विभाग निमशासकीय या ठिकाणी नोकरी किंवा स्वतःचे शेतीपूरक व्यवसाय सुरू करू शकतात.

अभ्यासक्रमाची रूपरेषा

१) महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत माळी प्रशिक्षण हा एक वर्षाचा अभ्यासक्रम आहे. अभ्यासक्रम मराठी भाषेतून असून, कृषी पदविका तसेच कृषी पदवी प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मुख्य विषयांचा अंतर्भाव असतो.

२) फळबागा लागवड, देखभाल, भाजीपाला लागवड, काढणी काढणीपश्‍चात तंत्रज्ञान आदींबाबत सखोल माहिती.

३) हरितगृह तंत्रज्ञान, परसबागेतील लागवड तंत्रज्ञान, प्रात्यक्षिके, बोन्साय विषयाचा समावेश.

४) प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर केंद्रामार्फत रोजगाराच्या संधी उपलब्ध. मुक्त विद्यापीठाच्या कृषी अधिष्ठान अभ्यासक्रमासाठी थेट प्रवेश.

Gardening Training
Indian Agriculture : शेती व्यवसाय बंधनमुक्त करावा

रोजगाराच्या संधी

१) स्वतःचा व्यवसाय, रोपवाटिका, वास्तूंचे सुशोभीकरण, परसबागेतील सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला लागवड, फळबाग लागवड, विविध घरगुती, सांस्कृतिक कार्यक्रमातील फुलांची सजावट, भेटवस्तू निर्मिती, दवाखाने, खासगी कार्यालयातील बाग बगीचा देखभालीचे कंत्राट, शासकीय कार्यालयातील परिसर सुशोभीकरणाचे कंत्राट अशा संधी उपलब्ध आहेत.

नोकरीच्या संधी

१) राज्य तसेच केंद्र सरकार अखत्यारीत कार्यालय, शासनाचे विविध उपक्रम चालविणाऱ्या संस्था आदींमध्ये परिसर सुशोभीकरणासाठी शासनाने माळी या पदासाठी काही जागा आरक्षित केले आहेत. विशेषतः महिलांसाठी राखीव जागांची तरतूद आहे.

२) नामांकित खासगी कंपन्यांच्या प्रतिनिधींना संस्थेत निमंत्रित करून कॅम्पस मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात.

पात्रता व निकष व इतर बाबी

१) महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातून नववी पास किंवा दहावी नापास विद्यार्थ्याला अभ्यासक्रमास प्रवेश.

२) विद्यार्थ्याचे वय १४ ते ३० दरम्यान असावे.

३) महिलांसाठी राखीव जागा.

४) अभ्यासक्रमासाठी कोणतीही शासकीय शिष्यवृत्ती उपलब्ध नाही.

आवश्यक कागदपत्रे

१) नववी परीक्षा उत्तीर्णचे गुणपत्रक.

२) शाळा सोडल्याचा दाखला.

३) जातीचे प्रमाणपत्र.

४) नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र

५) चालू किंवा मागील वर्षाचा सात-बारा उतारा

६) वैद्यकीय प्रमाणपत्र

७) दोन फोटो

८) आधार कार्ड.

संपर्क : प्रवीण सरवळे, डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय, बारामती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com