Farmer Producer Organisations : सुमारे ४४ हजार नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्यांमुळे (FPOs) भारतातील एफपीओ परिसंस्था आता सक्षम झाली आहे. या माध्यमातून देशातील विकसित आणि अविकसित भागांतील शेतकरी एकत्र येऊन त्यांच्या शेतमालास चांगला भाव मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शेतकरी मोठ्या संख्येने संघटित झाल्याने त्यांची शेतमालास चांगला भाव मिळवण्यासाठी वाटाघाटी करण्याची क्षमता वाढली आहे..पण हे सर्व काही सोपे नव्हते. कारण यापैकी बहुतांशजणांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले. यात कुशल मनुष्यबळाचा अभाव, संस्थात्मक कर्ज पुरवठा आणि भांडवली गुंतवणुकीचा समावेश आहे, ज्या शेतकरी उत्पादक कंपन्या मजबूत करण्यासाठी गरजेच्या आहेत..Farmer Producer Organizations: शेतकरी उत्पादक संस्थांसाठी एक नवीन दृष्टिकोन.गेल्या २० वर्षांत डिजिटल तंत्रज्ञानामुळे कार्यक्षमता वाढली आहे. तसेच कृषी-तंत्रज्ञान स्टार्टअप्स उत्पादन आणि वितरण वाढवणाऱ्या अनेक सेवा पुरवत असल्याने शेतकरी उत्पादक कंपन्यांचा विकास झाला आहे.."काही जण अयशस्वी ठरलेल्या अथवा अडचणीत सापडलेल्या उत्पादक कंपन्यांच्या गोष्टी करतात. अशा शेकडो कंपन्यांनी त्यांचे कामकाज बंद केल्याची उदाहरणे दिली जातात. तथापि, हे लक्षात घेतले पाहिजे की विविध क्षेत्रात अपयश येऊ शकते. ही बाब शेतकरी उत्पादक कंपन्यांपुरती मर्यादित नाही," असे नॅशनल असोसिएश फॉर फॉर्मर प्रोड्युसर ऑर्गनायजेशन (NAFPO) चे अध्यक्ष (स्टीयरिंग कमिटी) परवेश शर्मा यांनी म्हटले आहे..Farmer Producer Company: शाश्वत मॉडेलच तारेल ‘एफपीसीं’ना.शेतकरी उत्पादक कंपन्यांसमोरील आव्हाने कोणती?भारतातील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सद्यस्थितीबाबतचा 'स्टेट ऑफ द सेक्टर रिपोर्ट २०२५', नुकताच नाबार्ड आणि समुन्नती यांनी संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या एफपीओ कॉन्क्लेव्हमध्ये प्रकाशित करण्यात आला. या अहवालातून उत्पादक कंपन्यांसमोरील आव्हाने आणि संधी यांचे वास्तव मांडण्यात आले आहे..२०२० मध्ये केंद्राने जाहीर केलेल्या १० हजार-एफपीओ योजनेतर्गंत १०,०९९ शेतकरी उत्पादक कंपन्यांची यशस्वीरित्या नोंदणी झाली. कारण त्याला नाबार्ड आणि नाफेड सारख्या संस्थांकडून धोरणात्मक आणि संस्थात्मक समर्थन मिळाले..Farmer Producer Company : शेतकरी उत्पादक कंपनीचा दिल्लीत डंका.समुन्नतीच्या सहकार्याने स्थापन झालेल्या नॉन-बँकिंग वित्तीय संस्था नबकिसान फायनान्स लिमिटेडने सुमारे १,७०० या कंपन्यांना पाठबळ दिले..“उत्पादक कंपन्या इकोसिस्टमला दुहेरी दृष्टिकोनाची गरज आहे. पहिले म्हणजे त्यांना मजबूत करून त्यांना संस्थात्मक आकार देणे आणि दुसरे म्हणजे त्यांना संघटनात्मक स्थैर्य मिळवून देण्यासाठी आवश्यक असलेली संस्थात्मक यंत्रणा विकसित करणे,” असे या अहवालातून सूचित केले आहे..शेतकरी उत्पादक कंपन्यांचा विस्तारतथापि, अशा कंपन्यांच्या विस्ताराबाबत देशभर समानता दिसून येत नाही. देशातील एकूण उत्पादक कंपन्यांपैकी सुमारे एकतृतीयांश कंपन्या महाराष्ट्रात कार्यरत आहेत. यात महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो. उत्तर प्रदेशात ६,५२४ उत्पादक कंपन्या आहेत. यावरून असे दिसून येते की ही चळवळ देशभर पसरलेली नाही..भांडवली गुंतवणुकीचे कमी प्रमाण हे या कंपन्यांसमोरील एक मोठे आव्हान आहे. "१५ लाख रुपयांहून अधिक भांडवल असलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांची एकूण संख्या केवळ ३८७ आहे," असे अहवालात नमूद केले आहे..या कॉन्क्लेव्हदरम्यान काही शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या नेत्यांनी मते मांडली. यावेळी सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांनी म्हटले की, शेतकऱ्यांनी भांडवली गुंतवणुकीत योगदान देण्याबाबत गंभीरपणे विचार केला पाहिजे..ते पुढे म्हणाले, “शेतकऱ्यांनी याकडे त्यांच्या शेतीतील गुंतवणुकीचा एक भाग म्हणून पाहायला हवे. या सामुहिक भांडवलीचा पायाभूत सुविधा उभारण्यासाठी वापर केला जाऊ शकते, जी त्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळवून देण्यास मदत करु शकते.”.या अहवालातून याकडे लक्ष वेधण्यात आले आहे की नोंदणीनंतर मोठ्या संख्येने एफपीओ सक्रिय राहात नाहीत. कमकुवत व्यवस्थापन, अपुऱ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक अथवा व्यवसायाच्या संधींचा अभाव ही यामागील कारणे आहेत..‘फायलिंग ऑफ रिटर्न्स, वार्षिक सर्वसाधारण सभांचे आयोजन आणि आवश्यक नोंदी ठेवणे ह्या गोष्टी अद्यापही आव्हानात्मक ठरत आहेत. अनेक कंपन्यांकडे प्रशिक्षित असे मनुष्यबळ नाही. अथवा त्यांच्याकडे सातत्याने नियमांचे पालन करण्यासाठी आवश्यक अशा आधारभूत यंत्रणेचा अभाव दिसून येतो,” असेही अहवालात म्हटले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.