Fruit Fly : बुरशी खाणाऱ्या ऑर्किडचे फळमाशीशी अनोखे संबंध

Fruit Pest : बुरशीवर जगणारे ऑर्किड्स हे आपली फुले बुरशी खाणाऱ्या फळमाश्यांना देऊन त्या बदल्यात स्वतःचे परागीकरणही करून घेत असल्याचे प्रथमच आढळले आहे.
fruit fly on mango
fruit fly on mango
Published on
Updated on

orchids : बुरशीवर जगणारे ऑर्किड्स हे आपली फुले बुरशी खाणाऱ्या फळमाश्यांना देऊन त्या बदल्यात स्वतःचे परागीकरणही करून घेत असल्याचे प्रथमच आढळले आहे. वनस्पती आणि सजीवाच्या सहजीवी संबंधाच्या या उत्क्रांतीच्या टप्प्यातील महत्त्वाच्या आणि अनोख्या घटनेचा पुरावा पहिल्यांदाच जपानमधील कोबे विद्यापीठातील संशोधकांना रोपवाटिकेतील ऑर्किड्स मध्ये आढळला आहे.

ऑर्किड्स आपल्या वैविध्यपूर्ण आकार, फुलांचे रंग याद्वारे परागीभवन करणाऱ्या कीटकांना आकर्षित करत असते. अनेक वेळा ते एखाद्या खाद्य स्रोताची, पैदासयोग्य भूमीची किंवा कीटकाच्या जोडीदाराची नक्कल करूनही आपले परागीभवनाचे काम ते किटकांकडून करून घेतात. स्वतः प्रकाश संश्लेषण न करणारे आणि बुरशीवर जगणारे ऑर्किड (गण - गॅस्ट्रोडिया) हेही त्यापेक्षा वेगळे नाही. हे ऑर्किड ड्रोसोफिला फळमाशीला आकर्षित करण्यासाठी पक्वतेनंतर कुजायला सुरू झालेल्या फळांचा किंवा कुजणाऱ्या अळिंबी या त्यांच्या खाद्याप्रमाणे असलेला गंध उत्सर्जित करते. त्या वासाकडे आकर्षित झालेली फळमाशी काही काळाकरिता त्या फुलामध्ये अडकते आणि तिच्या पाठीवर पराग घेऊन दुसऱ्या त्याच प्रजातीच्या ऑर्किडकडे जाते. यातून त्या फळमाशीला काहीच मिळत नसले तरी ऑर्किड या एकाच घटकाला सर्व फायदा मिळत असल्याचे कोबे विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञ स्युतसुगू केन्जी यांना आढळले. त्यांनी त्यांचे निष्कर्ष जर्नल इकॉलॉजी मध्ये प्रकाशित केले आहेत.

fruit fly on mango
Abdul Sattar : सत्तारांविरोधात विरोधकांचे अनोखे आंदोलन

गॅस्ट्रोडिया फोईटीडा गणातील एक ऑर्किड आपल्या रसदार पाकळ्या कुजून परागीकरणाच्या काही दिवसातच पडून जात असल्याचे दिसून आले. त्यामागील कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. फळमाश्या सामान्यतः वनस्पतीच्या फुलांमध्ये अंडी घालतात. त्यातून बाहेर आलेली अळी त्याचे भाग खात प्रौढ होते. स्युतसुगू केन्जी यांनी सांगितले, की इथे ड्रोसोफिला बायझोनाटा या माशीचे नाव जरी फळमाशी असे असले तरी ती अळिंबी खाणारी असून, त्यातही ती प्रामुख्याने गॅस्ट्रोडिया फोईटीडा या ऑर्किडच्या फुलांच्या कुजणाऱ्या पाकळ्यांचा पैदास जागा म्हणून वापर करते. हे ऑर्किड स्वतः बुरशी जगणारे व प्रकाश संश्लेषण न करणारे असून, तिचा गंध आणि चव ही तिच्या खाद्य बुरशीप्रमाणे असते. त्यामुळे अळिंबीकडे आकर्षित होणाऱ्या फळमाश्या तिच्याकडे आकर्षित होतात. या वनस्पतीच्या गळलेल्या फुलांच्या पाकळ्यावर आपली अंडी घालतात. यात एका बाजूला सगळा फायदा होतो. कारण परागीकरणानंतर ऑर्किडला पाकळ्याची काहीही आवश्यकता नसते. ही एक दुहेरी सहजीवी संबंधाच्या पहिल्या टप्प्यावरील उत्क्रांतीची प्रक्रिया असल्याचे मत जीवशास्त्रज्ञांनी मांडले आहे.
ऑर्किडच्या सुमारे ३० हजारापेक्षा अधिक प्रजाती असून, त्यांच्या सुरुवातीच्या परागीकरणाचे पुरावे मिळाले आहेत. निसर्गामध्ये दोघांनाही फायदेशीर ठरणाऱ्या सहजीवी संबंध मोठ्या प्रमाणात दिसून येतात. त्या तुलनेत सर्व फायदा एकाच प्रजातीला मिळत असून, सहजीवी संबंध असल्याची उदाहरणे अत्यंत दुर्मिळ आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com