MGNREGA Scheme : अकुशल मजुरांच्या १२०० कोटींचे आजपासून वितरण

Rural Employment : केंद्रीय कृषिमंत्री यांच्याशी चर्चा झाल्यानंतर अकुशल कामाचे बाराशे कोटी रुपये राज्याला प्राप्त झाले आहेत. सोमवारपासून प्रत्येक जिल्ह्याला निधी वितरित करण्यात येणार आहे.
MGNREGA
MGNREGAAgrowon
Published on
Updated on

Solapur News : रोजगार हमी योजनेअंतर्गत कुशल कामाची २६०० कोटीची मजुरी तर अकुशल कामाचे १२०० कोटी केंद्र शासनाकडे थकीत होते. केंद्रीय कृषिमंत्री यांच्याशी चर्चा झाल्यानंतर अकुशल कामाचे बाराशे कोटी रुपये राज्याला प्राप्त झाले आहेत. सोमवारपासून प्रत्येक जिल्ह्याला निधी वितरित करण्यात येणार आहे.

मिळालेला निधी तात्काळ संबंधित मजुरांच्या बँक खात्यावर जमा करावा अशा सूचना राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खार भूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी दिल्या. नियोजन भवनात त्यांनी जिल्ह्यातील रोजगार हमी योजनाच्या कामांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

MGNREGA
Rural Employment : ग्रामरोजगार सेवकाने कुटुंबीयांच्या नावे काढली ‘रोहयो’ची बिले

यावेळी अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, उपजिल्हाधिकारी रोहयो अंजली मरोड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक १ चे कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे, क्रमांक २ चे संतोष कुलकर्णी, पंढरपूरचे अमित निमकर आदी उपस्थित होते.

रोहयो मंत्री श्री गोगावले म्हणाले, उर्वरित २६०० कोटीचा निधीही पुढील आठवड्यात राज्य शासनाकडे प्राप्त होईल. ६०: ४० अंतर्गत स्थगिती दिलेल्या कामे सुरू करण्याबाबत लवकरच मान्यता मिळेल. रोहयो अंतर्गत वन औषधी लागवड, बांबू लागवड यासारख्या नवीन योजना राबवल्या जात असून संबंधित शासकीय विभागांनी अन्य नव संकल्पना राबवून मजूर व शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळवून द्यावा.

MGNREGA
Rural Employment: खेड्यांतच रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर

प्रत्येक गावात रोजगार हमी योजनेचे कामे सुरू राहतील व मजुरांचे स्थलांतर इतरत्र होणार नाही अशा रीतीने संबंधित अधिकाऱ्यांनी कामे केली पाहिजेत. या कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नये.

प्रारंभी उपजिल्हाधिकारी रोहयो अंजली मरोड यांनी सोलापूर जिल्ह्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध यंत्रणामार्फत सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी कृषी विभागांतर्गत सुरू असलेल्या कामकाजाची माहिती दिली.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत रोजगार हमी योजना कामांचा २६ कोटीचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी मंत्री गोगावले यांच्याकडे करण्यात आली.

आकडे बोलतात...

जिल्ह्यात सुरू असलेली कामे १२००

कामावर असलेले मजूर ७३२

रोहयोवरील मजुरांचे आधार लिंक ९६ टक्के

रोहयोची सेल्फ वरील कामे २४४९२

जॉब कार्ड मिळालेले मजूर १० लाख ३९००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com