Nashik News: आगामी सिंहस्थ कुंभमेळा, जिल्ह्यातील रस्तेसुरक्षेच्या उपाययोजना, पर्यटन आणि उद्योग विकास, तसेच अक्षांकीत तालुक्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी निधीची आवश्यकता आहे. त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेत वाढीव ६४२ कोटीचा निधी मिळावा, अशी मागणी जिल्हा प्रशासनातर्फे मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नोंदविण्यात आली. या वेळी जिल्ह्याचा विकासाच्या आराखड्याचे मुख्यमंत्र्यांसमोर सादरीकरण करण्यात आले..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत बुधवारी (ता. ११) नाशिक विभागीय जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या प्रसंगी मुंबई येथून मुख्यमंत्र्यांसमवेत अन्न व पुरवठामंत्री छगन भुजबळ, शिक्षणमंत्री दादा भुसे, नाशिक येथून आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, आमदार दिलीप बनकर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते..Nashik Kumbh Mela: परळी-मुंबई विशेष रेल्वे सुरू करा; कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मागणी.राज्यस्तरावरून जिल्ह्याला २०२६-२७ साठी जिल्हा वार्षिक योजनेतून सर्वसाधारणची ६९२ कोटींची मर्यादा कळविण्यात आली आहे. पण, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यावर अतिरिक्त ताण वाढणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने वाढीव ६४२ कोटींची मागणी मुख्यमंत्र्यांकडे नोंदविली. या निधीतून जिल्ह्यांतील ३७९ अपघातप्रवण ठिकाणांवर तातडीने उपाययोजना करायच्या आहेत..सुरगाणा, इगतपुरी, पेठ, त्र्यंबक, कळवण आणि बागलाण या सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास तालुक्यांच्या विकासासाठी विशेष तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यातही सुरगाण्यावर विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या प्रसंगी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सुरू असलेल्या कामांची सद्यःस्थितीची माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली..जिल्हा हा सर्वाधिक महसूल देणारा आहे. जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या, झपाटाने होणारा विकास लक्षात घेता विविध विभागांनी केलेल्या मागण्या बघता निधीची कमतरता भासू नये, अशी सूचना मंत्री भुजबळ यांनी केली. नाशिकमधील पर्यटनवाढीसाठी नाशिक कलाग्राम आणि गंगापूर धरण येथील सीप्लेनबाबत लवकर कार्यवाहीची त्यांनी मागणी केली. मंत्री भुसे यांनी शाळा खोल्यांची दुरुस्ती आणि वर्गखोल्यांसाठी वाढीव निधीची मागणी केली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.