Yavatmal News : भुईमुगाला शेंगधारणा कशी होते, भाजीपाल्याचे उत्पादन कसे घेतले जाते, असे एक ना अनेक प्रश्न बालमनातील विद्यार्थ्यांच्या मनात घोंगावत असतात. त्यांच्या मनातील या प्रश्नांची कोंडी फुटावी त्यांना प्रात्यक्षिक स्वरूपातच शेती अनुभवता यावी याकरीता बोरी प्रकल्प शाळेवरील नौशाद खान पठाण या शिक्षकाने पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे नौशाद खान हे स्वतः प्रयोगशील शेतकरी असून शून्य मशागत तंत्रज्ञानाचा अवलंब त्यांनी केला आहे.
नौशादचे वडील सरदार खान पठाण हे शेतकरी. त्यामुळे नौशाद खान यांनाही शेतीची ओढ होतीच, परंतु त्यांनी शेतीसोबतच आपले शिक्षणही सुरू ठेवले. इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इंग्रजी, अर्थशास्त्र यांसह अन्य एका विषयात ते एमएची डिग्री त्यांनी मिळविली.
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. त्यामध्ये खिचडी व पालेभाज्यांचाही समावेश राहतो. हीच बाब लक्षात घेता नौशाद खान पठाण यांनी या ठिकाणी आपल्या शेती कौशल्याचा वापर करण्याचा निर्णय घेतला. रामनगर रुई येथील जिल्हा परिषद शाळेत त्यांनी ६० शेवग्यांची झाडे लावली. शालेय पोषण आहार या उपक्रमांतर्गंत याची लागवड करण्यात आली.
नौशाद यांची जुलै २०२३ मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरी प्रकल्प येथे बदली झाली. त्याचवेळी त्यांनी याही शाळेत पोषक परसबागेचा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. १७५ शेवगा झाडे आणि आंबा, पेरू, फणस, चिकू अशा ५० प्रकारच्या फळझाडाची लागवड शाळेत केली.
लोकवर्गणीतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किसन जाधव, सदस्य जीवन राठोड, ग्रामपंचायत सदस्य बाबाराव चव्हाण, नीतेश राठोड, मुकेश राठोड, गजानन पवार, मुख्याध्यापक अनिल येल्के, अर्चना पवार, सुषमा राठोड यांचेही सहकार्य त्यांना मिळाले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.