Mango Fruit Fall : रत्नागिरी जिल्ह्यात हापूस कलमांमध्ये फळगळ

Mango Crop Damage : यंदाचा आंबा हंगाम समाधानकारक जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र बदलत्या हवामानामुळे मोहराला आलेली बारीक कैरी गळून जात आहे.
Mango Farming
Mango ProductionAgrowon
Published on
Updated on

Ratnagiri News : गेले काही दिवस जिल्ह्यात किमान आणि कमाल तापमानात मोठी तफावत दिसून येत आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रात धुके आणि थंड वातावरण तर दुपारी कडकडीत ऊन यामुळे हापूस कलमांवर लागलेली शेंगदाण्याएवढी कैरी पिवळी पडून गळून जात आहे. यंदा जानेवारीत नैसर्गिकरित्या मोहर येण्याचे प्रमाण अल्प असल्याने मे महिन्यातील उत्पादन कमी राहील, अशी शक्यता आंबा बागायतदारांनी वर्तविली आहे.

यंदाचा आंबा हंगाम समाधानकारक जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र बदलत्या हवामानामुळे मोहराला आलेली बारीक कैरी गळून जात आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे. आंबा फवारणी करूनही गळती थांबत नसल्याने अपेक्षेपेक्षा यंदा आंबा हंगाम कमी कालावधीचा राहील.

Mango Farming
Mango Export : निर्यातक्षम आंब्याची ‘मँगोनेट’वर नोंदणी करा ; कृषी विभागामार्फत नोंदणीसाठी विशेष मोहीम; २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत

यावर्षी पाऊस उशिरापर्यंत राहिल्यामुळे नोव्हेंबर महिन्यात कलमांना मोहोरच आलेला नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील उत्पादन अत्यल्प राहिली. त्यानंतर डिसेंबर महिन्यात आलेल्या मोहरावर मार्च अखेरीस उत्पादनाला सुरुवात होईल. यामधून एप्रिलमध्ये आवक चांगली राहील. पुढे मे च्या पहिल्या आठवड्यानंतर आंबा आवक कमी होत जाईल, असा बागायतदारांचा अंदाज आहे.

गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअसपर्यंत राहिले आहे. मात्र किमान तापमान १३ ते १७ अंशांपर्यंत आहे. या तफावतीचा परिणाम आंबा बागायतीवर होत आहे. बहुसंख्य बागांमध्ये झाडांवर बारीक कैरी दिसत आहे.

दुपारच्या उन्हामुळे बारीक कैरीची गळ होत आहे. तसेच तुडतुडा, थ्रिप्स, करपा आणि बुरशी या रोगांचा प्रादुर्भावह ठिकठिकाणी दिसत असल्यामुळे त्यापासून आंबा पिकाचे संरक्षण करण्याचे आव्हान आहे.

Mango Farming
Export-Grade Mango Registration: निर्यातक्षम आंबा नोंदणीसाठी अंतिम संधी; फक्त दोन दिवस शिल्लक!

रत्नागिरी तालुक्यातील वाटद-खंडाळा येथील बागायतदार उमेश रहाटे म्हणाले, की या वर्षी आंबा उत्पादन १५ ते २० टक्केच राहणार आहे. त्यामुळे कीड, रोगांपासून उत्पादनाचे संरक्षण करण्याची कसरत करावी लागत आहे. या वर्षी हंगामाचे दिवस कमी राहणार असून मार्चमध्ये चांगला दर मिळतो, तेव्हा बाजारात अपेक्षित हापूस नसेल.

आरोग्याच्या तक्रारी वाढताहेत

उन्हाचा कडाका सुरू झाल्यामुळे मानवी आरोग्यावर परिणाम जाणवत आहे. दुपारच्या सुमारास शहरांमधील रस्त्यांवरील गर्दी कमी झालेली दिसते. त्याचबरोबर ताप, खोकल्याचे रुग्ण वाढलेले आहेत. मात्र अजूनही शाळांच्या वेळांमध्ये बदल झालेला नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com