Fruit Crop Cluster : भंडारा जिल्ह्यात आता फळपिकांचे क्‍लस्टर

Agriculture Department : कृषी विभागाच्या पुढाकाराने भंडारा जिल्ह्यात फळपिकांचे क्‍लस्टर तयार होत आहे.
Agriculture
AgricultureAgrowon
Published on
Updated on

Bhandara News : भंडारा जिल्हा भातावर भिडला, असे गंमतीने म्हटले जाते. या भागात शेतकरी धान लागवड अधिक करतात आणि पीक बदलासाठीही तयार होत नसल्यामुळे असा वाक्यप्रचार रुढ झाला. आता मात्र कृषी विभागाच्या पुढाकाराने जिल्ह्यात फळपिकांचे क्‍लस्टर तयार होत असून ही मुंडीपार, सिंदीपार, मोरगाव गावांमध्ये १६ एकरावर केसर आंब्याची लागवड करण्यात आली आहे.

पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्याला धानाचे कोठार म्हटले जाते. एकाच पीकावर अवलंबिता असल्याने या भागातील शेतकऱ्यांची आर्थिकस्थिती मात्र सुधारली नाही. उपविभागीय कृषी अधिकारी किशोर पात्रीकर यांनी ही बाब गंभीरतेने घेत या भागात फळपिकाला प्रोत्साहन दिले आहे.

त्याच्याच प्रयत्नातून आता मनरेगाअंतर्गंत १६ एकरांवर केसर आंबा लागवड झाली आहे. येत्या काळात पाच एकरांवर नव्याने लागवड होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या बदलाविषयी कळाल्यानंतर फलोत्पादन संचालक कैलास मोते, उदय देशमुख यांनी देखील या भागातील फलोत्पादन क्षेत्राला भेट दिली. कृषी सहाय्यक विक्‍की वंजारी यांचे देखील योगदान यात राहिले आहे.

Agriculture
Fruit Crop Research : हवामान बदलानुसार द्यावा फळ पीक संशोधनावर भर

अभ्यास दौऱ्यातून मिळाले प्रोत्साहन

विदर्भातील शेतकरी पश्‍चिम महाराष्ट्रातील शेती पाहण्यासाठी येतात असा नेहमीचा अनुभव आहे. मात्र तत्कालीन तालुका कृषी अधिकारी म्हणून किशोर पात्रीकर यांच्या नेतृत्वात सडक अर्जुनी तालुक्‍यातच शेती क्षेत्रात मोठे परिवर्तन घडले. ड्रॅगन फ्रुट, पपई, केळी, ॲपल बोर, आंबा, रक्‍तचंदन यासारखी पिके या भागात आहेत. हे बघितल्यानंतर शेतकऱ्यांनी फळपिकांकडे वळण्याचा निर्णय घेतला.

Agriculture
Fruit Crop Management : जास्त थंडीचा फळबागेवर होणारा परिणाम

शेतकऱ्यांची होणार कंपनी

पिकांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी याकरीता शेतकऱ्यांची कंपनी स्थापन करण्याचे प्रस्तावीत आहे. त्या माध्यमातून पुढील काळात उत्पादीत फळांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यावर भर राहणार आहे.

शेतकरी सांगतात

चंद्रशेखर टेंभुर्णे (मुंडीपार, ता. लाखनी) हे रोजगाराच्या शोधात स्थलांतर करीत होते. त्यांची अर्धा एकर शेती. त्यातील २० आर क्षेत्रावर दोन वर्षांपूर्वीची फळबाग असून यात आंतरपीक कारली, दोडक्याची लागवड करण्यात आली होती. त्यानंतर टरबूज लागवड करण्यात आली. आता टरबूज विक्रीसाठी आले आहे.

१४ बाय ६ फुट असे फळपीक लागवडीकरिता अंतर ठेवण्यात आले आहे. या अतीसघन लागवड पद्धतीमुळे २४० झाडे बसली आहेत. संदेश पंधरे यांची अवघी ३० आर शेती असून या संपूर्ण क्षेत्रात आंबा लागवड करण्यात आली आहे. एक वर्षाची झाडे असल्याने यात आंतरपीक म्हणून कारली व इतर भाजीपाल्याची लागवड ते करतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com