Sugar Factory: २०२५-२६ गाळप हंगामात कारखान्यांकडे ऊस दिलेल्या शेतकऱ्यांची एफआरपी थकबाकी अद्याप न मिळाल्याने उमरखेड आणि हदगाव तालुक्यातील ऊस उत्पादकांमध्ये संतापाची लाट आहे. थकीत रकमेच्या प्रश्नावर शिवसेना सहसंपर्क प्रमुख चितांगराव कदम यांनी संबंधित साखर कारखान्यांना निवेदन देत धडक आंदोलनाचा इशारा दिला आहे..भैरवनाथ शुगर मिल, पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याने फेब्रुवारी महिन्यात गाळपासाठी नेलेल्या उसाची सुमारे तीन कोटी रुपयांची एफआरपी थकबाकी अद्याप शेतकऱ्यांना अदा केलेली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. यापूर्वी शेतकऱ्यांनी कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर उपोषण आंदोलन केले होते..Sugarcane Farmers Protest: ओंकार साखर कारखान्यासमोर थकीत ऊस बिलासाठी आंदोलन.त्यावेळी कारखाना प्रशासनाने ३० एप्रिलपर्यंत थकबाकी देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र मुदत उलटल्यानंतरही पैसे न मिळाल्याने शेतकरी पुन्हा आक्रमक झाले आहेत..Farmers Protest: कोकणातील बागायतदारांच्या समस्यांबाबत राजू शेट्टींनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, मुंबईतील धडक मोर्चाला पाठिंबा.त्याचप्रमाणे मंगरुळ येथील डेक्कन शुगर मिलकडे उमरखेड आणि हदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची तब्बल ३७ कोटी रुपयांची एफआरपी थकबाकी असल्याचा दावा करण्यात आला आहे. चार महिन्यांपासून पैसे रखडल्याने ऊस उत्पादक आर्थिक संकटात सापडले असून खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे..धडक आंदोलनाचा इशारादरम्यान, पहिल्या टप्प्यात भैरवनाथ शुगर मिल, पोफाळी येथे धडक आंदोलन आणि निषेध मोर्चा काढण्यात येणार असून डेक्कन शुगर मिल, मंगरुळ येथे उपोषण आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. एफआरपीची थकबाकी तातडीने अदा न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही शेतकरी नेत्यांनी दिला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.