Sugarcane FRP : ‘सोनहिरा’तर्फे ‘एफआरपी’ १०९ रुपये जमा

Sonhira Cooperative Sugar Factory : डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याकडे २०२२-२३ मध्ये गाळपास आलेल्या उसाची ‘एफआरपी’ची उर्वरित रक्कम प्रतिटन १०९ रुपये याप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे.
FRP Issue
FRP IssueAgeowon

Sangli News : डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याकडे २०२२-२३ मध्ये गाळपास आलेल्या उसाची ‘एफआरपी’ची उर्वरित रक्कम प्रतिटन १०९ रुपये याप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे.

त्यामुळे संपूर्ण एफआरपीची रक्कम प्रतिटन ३ हजार १६९ रुपये शेतकऱ्यांना प्राप्त झाले आहेत, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार मोहनराव कदम यांनी दिली.

FRP Issue
Sugarcane Rate : सोनहिरा’चा ३०६० रुपये पहिला हप्ता

श्री. कदम म्हणाले, की कारखान्याने गाळप हंगाम २०२२-२३ मध्ये उच्चांकी ९ लाख ९ हजार १२५ टन उसाचे गाळप केले. तर ऊस बिलापोटी प्रतिटन ३ हजार ६० रुपयांचा पहिला हप्ता कारखान्याने ऊसपुरवठा केलेल्या उत्पादक शेतकऱ्यांना यापूर्वी अदा केलेला आहे.

तर खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांना पैसे उपलब्ध व्हावेत यासाठी ३ हजार १६९ या एफआरपीपोटी उर्वरित रक्कम प्रतिटन १०९ रुपये जमा करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला. त्याप्रमाणे सदरची रक्कम कारखान्याने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे.

डॉ. पतंगराव कदम सोनहिरा साखर कारखान्याकडे २०२२-२३ मध्ये ऊसपुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना एफआरपीची उर्वरित रक्कम १०९ रुपये आज शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली. त्यापोटी कारखान्याने ९ कोटी ९० लाख ९४ हजार ५९३ रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहेत.

त्यामुळे डॉ. पतंगराव कदम सोनहिरा कारखाना हा पुन्हा एकदा राज्यातील सर्वाधिक ऊसदर देणारा साखर कारखाना ठरला आहे.

या वेळी कारखान्याचे उपाध्यक्ष जालिंदर महाडीक, संचालक रघुनाथराव कदम, कार्यकारी संचालक शरद कदम, सचिव अनिल कदम यांच्यासह सर्व संचालक मंडळ आदी मान्यवर उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com