Farmer Protest EU : फ्रान्समधील शेकडो शेतकरी दुसऱ्यांदा ट्रॅक्टर घेऊन पॅरिस शहरात शिरले; आंदोलन तीव्र होण्याची चिन्हे
French Farmers : प्रस्तावित कराराच्या विरोधात शेतकऱ्यांनी सोमवारी देखील फ्रान्सच्या सर्वात मोठ्या कंटेनर बंदरावर आणि पॅरिसच्या उत्तरेकडील मुख्य महामार्गावर वाहतूक वाहने अडवली होती. तर यापूर्वी शेकडो शेतकरी ट्रॅक्टरसह पॅरिस शहरात शिरले होते. त्यामुळे वाहतूक ठप्प होऊन महामार्गावर वाहनांच्या रांगा दिसत होत्या.