French Cheese Museum: ‘म्युसे द्यु फ्रॉमाज’ अर्थात चीज संग्रहालय...
France Cheese Production: पॅरिसमधील ‘म्युसे द्यु फ्रॉमाज’ संग्रहालयातील फ्रान्सचा चीज नकाशा पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, की एका छोट्याशा चीजच्या तुकड्यामागे किती मोठी कृषी व्यवस्था कार्यरत असते! कुठे गाईच्या दुधापासून चीज तयार होते, कुठे शेळीच्या, तर कुठे मेंढीच्या दुधापासून. प्रदेश बदलला, की पशुधन, चारा, दूध, प्रक्रिया पद्धती, चव, सुगंध आणि चीजचे नावही बदलते.