Best Farmer Award : मराठवाड्यातील चार शेतकऱ्यांना उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार

Agriculture Award : मराठवाड्यातील चार प्रगतशील शेतकऱ्यांना उत्तर प्रदेशातील मेरठ येथील मोदीपुरम येथे शेती पद्धती संशोधन आणि विकास मंडळाचे राष्ट्रीय पातळीवरील उकृष्ट शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात आले.
Farmer Award
Farmer Award Agrowon
Published on
Updated on

Nanded News : मराठवाड्यातील चार प्रगतशील शेतकऱ्यांना उत्तर प्रदेशातील मेरठ येथील मोदीपुरम येथे शेती पद्धती संशोधन आणि विकास मंडळाचे राष्ट्रीय पातळीवरील उकृष्ट शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार पहिल्या आंतरराष्ट्रीय एकात्मिक शेती पद्धती परिषदेच्या समारोप समारंभात रविवारी (ता. नऊ) मान्यवरांचे हस्ते वितरित करण्यात आले.

Farmer Award
Agriculture Award : दहा शेतकरी, दोन कर्मचाऱ्यांचा राज्य कृषी पुरस्काराने सन्मान

यावेळी झाशी येथील आरएलबीसीएयुचे कुलगुरू तथा भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे माजी महासंचालक डॉ. पंजाब सिंह होते. सन्माननीय अतिथी म्हणून परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू माननीय प्रा. डॉ. इंद्र मणी, मेरठ येथील एसव्हीपीएयुटीचे कुलगुरू माननीय डॉ. के. के. सिंह, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक (कृषी विस्तार) माननीय डॉ. राजबीर सिंह, झाशी येथील आरएलबीसीएयुचे माजी कुलगुरू माननीय डॉ. अरविंद कुमार, भागलपुर (बिहार) बीएयुचे माजी कुलगुरू माननीय डॉ. ए. के. सिंह, मोदीपुरम येथील भारतीय शेती संशोधन संस्थेचे संचालक डॉ. सुनील कुमार, एकात्मिक शेती प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे आदी उपस्थित होते.

Farmer Award
Agriculture Award : उत्कृष्ट कृषी संशोधनासाठी डॉ. काकडे यांना पुरस्कार

यावेळी परभणी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) इंद्र मणी यांनी पुरस्कार प्राप्त सर्व शेतकऱ्यांचे अभिनंदन केले. या पुरस्कारामध्ये प्रकल्पाच्या शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शेती करत असलेले प्रयोगशील शेतकरी रत्नाकर ढगे (सायाळ, ता. लोहा) प्रताप काळे (धानोरा काळे, ता. पूर्णा), ज्ञानोबा पारधे (बाभूळगाव, ता. परभणी), जनार्धन आवरगंड (माखणी, ता. पूर्णा), यांचा उकृष्ट शेतकरी पुरस्कारात समावेश आहे.

या कार्यक्रमात विद्यापीठाचे किटक शास्त्रज्ञ डॉ. अनंत लाड, शरद चेनलवाड, अर्जुन जाधव, प्रगतशील शेतकरी बालासाहेब हिंगे, सुरेश शृंगारपुतळे तसेच महिला प्रगतशील शेतकरी सुषमा देव (हदगाव, जि. नांदेड), श्रीमती सरीता बारहाते (मानवत, जि. परभणी), वंदना जोगदंडे (सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) यांचीही यावेळी उपस्थिती होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com